नववर्षाच्या प्रारंभी शिवसेनेतर्फे शहीद स्मारक, महापुरूषांच्या पुतळ्यांची स्वच्छता
By गणेश वासनिक | Updated: December 31, 2023 15:59 IST2023-12-31T15:59:43+5:302023-12-31T15:59:56+5:30
शिवसेना नेते तथा खासदार अरविंद सावंत यांच्या आदेशानुसार हा उपक्रम राबविण्यात आला.

नववर्षाच्या प्रारंभी शिवसेनेतर्फे शहीद स्मारक, महापुरूषांच्या पुतळ्यांची स्वच्छता
अमरावती: शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्यावतीने नववर्षाच्या पूर्वसंध्येला रविवारी अमरावती महानगरातील शहीद स्मारक आणि थोर महापुरुषांच्या पुतळ्यांचा स्वच्छता करून पूजन करण्यात आले. शिवसेना नेते तथा खासदार अरविंद सावंत यांच्या आदेशानुसार हा उपक्रम राबविण्यात आला.
शिवसेना महानगर प्रमुख पराग गुडधे यांच्या नेतृत्वात येथील ईर्विन चौक स्थित भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, जयस्तंभ चौकातील राष्ट्रपिता महात्मा गांधी पुतळा, चित्रा चौकातील समाजसुधारक महात्मा फुले यांचा पुतळा तर बडनेरा नवीवस्ती स्थित छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची स्वच्छता करण्यात आली. यावेळी अमरावती विधानसभा संघटक नितीन हटवार ,उपमहानगर प्रमुख संजय शेटे, विजय ठाकरे, सुनील राऊत, युवासेना जिल्हाप्रमुख प्रमोद धनोकार, तालुकाप्रमुख कपिल देशमुख ,विजय बेनोडकर, जयंत इंगोले, डॉ. जुबेर, याया खान पठाण, बंडू कथीलकर आदी शिवसैनिक उपस्थित होते.