सहायक जिल्हाधिकारी, तहसीलदार, बीडीओ रस्त्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 8, 2021 05:00 AM2021-04-08T05:00:00+5:302021-04-08T05:00:59+5:30

चिखलदरा  तालुक्यातील काटकुंभ येथे कोरोनाग्रस्त आढळून आल्याने  पाच दिवसांसाठी कडक लॉकडाऊन करण्यात आले आहे.  त्यामुळे संबंधित परिसराचा आढावा सहायक जिल्हाधिकारी तथा धारणीच्या उपविभागीय अधिकारी मिताली सेठी, तहसीलदार  माया माने, गटविकास अधिकारी प्रकाश पोळ तसेच प्रशासकीय यंत्रणेतील अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष जाऊन घेतला.

Assistant Collector, Tehsildar, BDO on the road | सहायक जिल्हाधिकारी, तहसीलदार, बीडीओ रस्त्यावर

सहायक जिल्हाधिकारी, तहसीलदार, बीडीओ रस्त्यावर

Next
ठळक मुद्देहॉटस्पॉट काटकुंभमध्येे सक्त ताकिद, नियम न पाळणाऱ्यांविरुद्ध गुन्हे

लोकमत न्यूज नेटवर्क
चिखलदरा : कोरोना हॉटस्पॉट ठरलेल्या चिखलदरा तालुक्यातील काटकुंभ येथे बुधवारी सकाळी ११ वाजता सहायक जिल्हाधिकारी, तहसीलदार, गटविकास अधिकारी यांनी आढावा घेतला. रस्त्यावर फिरणाऱ्या व कोरोना नियमाचे पालन न करणाऱ्या नागरिकांविरुद्ध तडक गुन्हे दाखल करण्याचे आदेश त्यांनी दिले. 
चिखलदरा  तालुक्यातील काटकुंभ येथे कोरोनाग्रस्त आढळून आल्याने  पाच दिवसांसाठी कडक लॉकडाऊन करण्यात आले आहे.  त्यामुळे संबंधित परिसराचा आढावा सहायक जिल्हाधिकारी तथा धारणीच्या उपविभागीय अधिकारी मिताली सेठी, तहसीलदार  माया माने, गटविकास अधिकारी प्रकाश पोळ तसेच प्रशासकीय यंत्रणेतील अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष जाऊन घेतला. यावेळी उपस्थित वैद्यकीय अधिकारी आदित्य पाटील, ग्रामपंचायत सचिव, संबंधितांना कोरोना नियमाचे कडक पालन करण्याचे आदेश दिले. रस्त्याने विनामास्क फिरणाऱ्यांना त्यांनी तंबी दिली. पॉझिटिव्ह असलेला रुग्ण होम आयसोलेशनमध्ये आहे किंवा नाही, याची प्रत्यक्ष पाहणी या अधिकाऱ्यांनी केली. बाहेर फिरताना दिसल्यास गुन्हे दाखल करून कोविड सेंटरमध्ये भरती करण्याचे संबंधित अधिकाऱ्यांना आदेश दिले.

चुरणी परिसराचा घेतला आढावा 
चिखलदरा पर्यटनस्थळ व  तालुक्यातील काटकुंभ आणि चुरणी हे तीन ठिकाण हॉटस्पॉट ठरले आहेत. तालुक्यात पहिल्यांदा ७३ कोरोना ॲक्टिव्ह रुग्ण असल्याने प्रशासनाने परिसरातील गावांना भेटी दिल्या. उपस्थित ग्रामपंचायत पदाधिकारी व आदिवासींना सहकार्य करण्याचे व कोरोना नियमाचे पालन करण्याचे आवाहन केले

 

Web Title: Assistant Collector, Tehsildar, BDO on the road

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.