आगग्रस्तांना माजी आमदारांकडून मदत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2021 04:12 IST2021-05-18T04:12:52+5:302021-05-18T04:12:52+5:30
चांदूर रेल्वे : तालुक्यातील राजुरा येथे १२ मे रोजी चार घरांना अचानक आग लागली. याची माहिती मिळताच माजी ...

आगग्रस्तांना माजी आमदारांकडून मदत
चांदूर रेल्वे
: तालुक्यातील राजुरा येथे १२ मे रोजी चार घरांना अचानक आग लागली. याची माहिती मिळताच माजी आमदार वीरेंद्र जगताप यांनी त्वरित घटनास्थळी धाव घेत त्या कुटुंबांना आर्थिक मदत दिली. राजुरा येथील डोमाजी टिके, सुरेश टिके, विनोद टिके, बंडू घरत यांच्या घराला अचानक आग लागली. घराशेजारील इंधन व एका घराचे दार यात जळून खाक झाले. ग्रामपंचायत सदस्य तथा काँग्रेसचे कार्यकर्ते भूषण काळे यांनी प्रसंगावधान ठेवत चारही घरांतील गॅस सिलिंडर बाहेर आणले. लगेच या घटनेची माहिती काळे यांनी प्रदेश युवक काँग्रेसचे सचिव परीक्षित जगताप व माजी आमदार वीरेंद्र जगताप यांनी घटनास्थळी धाव घेतली.