मेळघाटात अस्वलीचे हल्ले वाढले
By Admin | Updated: June 6, 2017 00:11 IST2017-06-06T00:11:57+5:302017-06-06T00:11:57+5:30
अस्वलीच्या हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी झाल्याची घटना धारणी तालुक्यातील चित्री गाव शेतशिवारात रविवारी घडली.

मेळघाटात अस्वलीचे हल्ले वाढले
तीन दिवसांत दुसरी घटना : चित्री येथील शेतकरी जखमी
लोकमत न्यूज नेटवर्क
चिखलदरा : अस्वलीच्या हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी झाल्याची घटना धारणी तालुक्यातील चित्री गाव शेतशिवारात रविवारी घडली. जवानसिंग दावल्या मोरे ( ५५, रा चित्री) असे जखमी शेतकऱ्यांचे नाव आहे.
प्राप्त माहितीनुसार, जवानसिंग नेहमीप्रमाणे आपल्या शेतात जात असताना जंगलातील रस्त्यालगतच्या झुडुपात लपून बसलेल्या अस्वलाने त्यांच्यावर झडप घातली. अस्वलाने त्यांच्या पायाला चावा घेत गंभीर जखमी केले. अस्वलाशी सामना करीत आरडा-ओरड केल्याने जवळपासचे शेतकरी त्यांच्या मदतीला धावले. यामुळे अस्वलीने जंगलात पळ काढला. जखमी जवानसिंग यांना हरिसाल येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी पाठविण्यात आले असून त्यांना ३८ टाके लागले आहेत.
तीन दिवसांत दुसरा हल्ला
शुक्रवारी मांगिया येथील बाबू शिकारी भिलावेकर नदीत आंगोळीसाठी गेला असताना त्याच्यावर अस्वलीने हल्ला चढवून गंभीर जखमी केले होते. त्यानंतर याच भागात घडलेली ही दुसरी घटना आहे. या भागात नेहमीच अस्वल दिसत असल्यामुळे परिसरात दहशत पसरली आहे. विशेष म्हणजे, नुकत्याच झालेल्या वन्यप्राणी गणँनेत अस्वलींची संख्या सर्वाधिक आढळली.