शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

कापसाला भाव नसल्याने खासगी बाजारात आवक थांबली

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 10, 2024 11:21 IST

परदेशातील निर्यात बंद : दर स्थिरावले, साठवणुकीकडे कल

गजानन मोहोड लोकमत न्यूज नेटवर्क अमरावती : शेतकऱ्यांचं पांढरं सोनं असलेल्या कापसाला खुल्या बाजारात क्विंटलमागे ७१०० तर सीसीआयच्या खरेदी केंद्रांवर ७४५० रुपयांपर्यंत भाव मिळत आहे. रुई आणि सरकीच्या भाव आंतरराष्ट्रीय स्तरावर माधारले आहेत. त्यामुळे तूर्तास भाववाढीची शक्यता नाही. परदेशात कापसाची निर्यात थांबली आहे. अशा परिस्थितीत दरवाढीच्या प्रतीक्षेत कापसाची साठवण हाच पर्याय शेतकऱ्यांपुढे आहे.

जिल्ह्यात कॅश क्रॉप म्हणून कापसाची ओळख आहे. किंबहुना खरीप हंगामात कपाशीचा पेरा सरासरी क्षेत्राच्या ५० टक्क्यांपर्यंत आहे. यावर्षी जिल्हाभरात सरासरीपेक्षा जास्त पाऊस, अतिवृष्टीमुळे कपाशीच्या पिकाचे नुकसान झाले. किंबहुना देशभरात हीच स्थिती असल्याने कापसाचे सरासरी उत्पादनात कमी येत आहे. त्यातच कापसाचा उत्पादन खर्च दरवर्षी वाढत आहे. बियाणे, रासायनिक खते, कीटकनाशके यांची दरवर्षी होत असलेली दरवाढ सोबतच कापूस वेचणीचा दर १० रुपये किलोवर गेल्याने उत्पादनखर्चात वाढ होत असताना त्या तुलनेत मार्केटमध्ये भाव नाही. कापसाला सध्या उठावच नसल्याने खुल्या बाजारात आवक थंडावली आहे. थोडीफार आवक सीसीआयच्या केंद्रांवर होत आहे. तिथेही आठ टक्के आर्द्रतेच्या निकषात हमीभावापेक्षा क्विंटलमागे ५० ते १०० रुपये कमी मिळत आहेत. परंतु खासगी खरेदीपेक्षा किमान क्विंटलमागे ३०० ते ४०० रुपये जास्त मिळत असल्याने अडचणीतील शेतकरी कापूस विक्रीसाठी आणत आहेत किंवा खेडा खरेदीत देत आहेत. यामध्ये शेतकऱ्यांची लूट होत आहे. उर्वरित शेतकरी दरवाढीच्या प्रतीक्षेत साठवणूक करीत असल्याने सध्या शेतकऱ्यांचे पांढरे सोने मातीमोल झाले आहे.

गारमेंट हब बांगलादेशात कापसाची निर्यात थांबली बांगलादेशात गारमेंटचा मोठा उद्योग असल्याने भारताकडून कापूस आयात केला जातो. सध्या तेथील राजकीय अस्थिरतेमुळे भारतातून होणारी निर्यात थांबली आहे. याचा फार मोठा फटका कापूस उद्योगाला बसला आहे. बांगलादेशात किमान १५ ते १६ लाख व चीनमध्ये १० ते १२ लाख गाठींची निर्यात व्हायची, यंदा निर्यात बंद असल्याने कापसाला उठाव नसल्याचे वास्तव आहे.

७० सेंट पर पाउंडवर स्थिरावला रुईचा भाव आंतरराष्ट्रीय बाजारात रुईचा ७० सेंट पर पाउंड (४५० ग्रॅम) असा भाव आहे. देशांतर्गत गाठीचा ५२ ते ५३ हजारांपर्यंत (१७५ किलो) भाव मिळत आहे. शिवाय सरकीलादेखील देशांतर्गत ३२०० ते ३३०० रुपये क्विंटल भाव आहे. या दरावरच सध्या बाजारभाव स्थिरावला आहे. त्यामुळे कापसाच्या दरात वाढ झालेली नसल्याची माहिती व्यापारी सूत्रांनी दिली.

"आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाला मागणी नाही. परदेशात जाणारी निर्यात थांबली आहे. त्यामुळे खासगी खरेदीत कापसाची आवक थंडावली आहे. थोडीफार खरेदी सीसीआयच्या केंद्रांवर होत आहे."- पवन देशमुख, शेतमाल दराचे अभ्यासक.

टॅग्स :Amravatiअमरावती