इंडियन टॅलेंट ऑलिम्पिडमध्ये आर्या खंडारे महाराष्ट्रातून टॉपर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2021 04:14 IST2021-09-18T04:14:13+5:302021-09-18T04:14:13+5:30

अमरावतीच्या मानात तुरा ; गोल्ड मेडने देऊन गौरव अमरावती ; इंडियन टॅलेंट ऑलिम्पिड मुंबई २०१९-२० मधील परीक्षेचा निकाल ...

Arya Khandare topper from Maharashtra in Indian Talent Olympiad | इंडियन टॅलेंट ऑलिम्पिडमध्ये आर्या खंडारे महाराष्ट्रातून टॉपर

इंडियन टॅलेंट ऑलिम्पिडमध्ये आर्या खंडारे महाराष्ट्रातून टॉपर

अमरावतीच्या मानात तुरा ; गोल्ड मेडने देऊन गौरव

अमरावती ; इंडियन टॅलेंट ऑलिम्पिड मुंबई २०१९-२० मधील परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर करण्यात आला आहे. यामध्ये शिवाजी शिक्षण संस्था संचालित श्याम नगर अमरावती येथील कस्तुरबा कन्या प्रायमरी इंग्लिश स्कूलची विद्यार्थिनी आर्या दिनेश खंडारे हिने राज्यातून टॉप येण्याचा मान पटकाविला आहे, या यशाबद्दल तिला गोल्ड मेडल देऊन शाळेच्या मुख्याध्यापिका साधना चंदेल यांच्या हस्ते गौरव करण्यात आले. देशात एकाच वेळी इंडियन टॅलेंट ऑलिम्पिड स्पर्धा घेण्यात आली होती. यात जिल्ह्यातील शेकडो विद्यार्थ्यांनी या स्पर्धेत सहभाग नोंदविला होता, अशातच कस्तुरबा कन्या प्रायमरी इंग्लिश स्कूलची विद्यार्थिनी आर्या दिनेश खंडारे क्लासमधून तसेच जिल्ह्यातून प्रथम क्रमांक पटकावित महाराष्ट्र टॉप आलेली आहे. तिच्या या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष हर्षवर्धन देशमुख, मुख्याध्यापिका साधना चंदेल यांच्या हस्ते गोल्ड मेडल देऊन तिचा गौरव केला. ती आपल्या यशाचे श्रेय तिने आई-वडील व शाळेच्या मुख्याध्यापिका साधना चंदेल यांना देत आहे,

Web Title: Arya Khandare topper from Maharashtra in Indian Talent Olympiad