गणेश विसर्जनासाठी शहरात ‘आर्टीफिशियल टँक’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2021 04:14 IST2021-09-19T04:14:32+5:302021-09-19T04:14:32+5:30
अमरावती : पर्यावरणाचा हानी टाळणे व स्वच्छता मोहिमेस सहकार्य होण्यासाठी शहरात महापालिकेद्वारे प्रमुख चौकांमध्ये आर्टिफिशियल टँकची सुविधा नागरिकांसाठी उपलब्ध ...

गणेश विसर्जनासाठी शहरात ‘आर्टीफिशियल टँक’
अमरावती : पर्यावरणाचा हानी टाळणे व स्वच्छता मोहिमेस सहकार्य होण्यासाठी शहरात महापालिकेद्वारे प्रमुख चौकांमध्ये आर्टिफिशियल टँकची सुविधा नागरिकांसाठी उपलब्ध करण्यात आलेली आहे. या ठिकाणी गणेश विसर्जन करण्याचे आवाहन करण्यात आलेले
रविवारला अनंत चतुर्थीच्या दिवशी महानगरपालिकेद्वारा गणेश विसर्जनासाठी अभियंता भवन शेगाव नाका, सहकार नगर, फार्मशी कॉलेज, छत्री तलाव, साईनगर साईमंदिर जवळ, बडनेरा, झिरी तलाव, गाेपाल नगर जीम जवळ, बडनेरा, बारीपुरा, रविनगर, हनुमान नगर, बुधवारा या ठिकाणी नागरिकांना आर्टीफिशियल टँकची सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे. या प्रत्येक ठिकाणी अमरावती महानगरपालिकेने नियंत्रण अधिकारी नेमून तेथील सर्व जबाबदारी त्यांच्यावर सोपविली आहे. नागरिकांनी आपल्या घरातील श्री. गणेश विसर्जन नेमून दिलेल्या जवळच्या आर्टीफिशियल टँकमध्येच विसर्जन करावे. जेणेकरून पर्यावरणाचा समतोल साधण्यास व स्वच्छता मोहिमेस नागरिकांचा हातभार लागेल, असे आवाहन महानगरपालिकेने केले आहे.