उन्हामुळे भाजीपाल्याची कृत्रिम भाववाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2016 00:21 IST2016-04-30T00:21:55+5:302016-04-30T00:21:55+5:30
शहरातील किरकोळ भाजीपाला विक्रेत्यांनी कृत्रिमरीत्या भाववाढ करून भाजीपाल्यांची नियमबाह्य दामदुप्पट भावाने विक्री सुरू केली आहे.

उन्हामुळे भाजीपाल्याची कृत्रिम भाववाढ
कांद्याची दामदुप्पट भावाने विक्री : ग्राहकांना धरले वेठीस
अमरावती : शहरातील किरकोळ भाजीपाला विक्रेत्यांनी कृत्रिमरीत्या भाववाढ करून भाजीपाल्यांची नियमबाह्य दामदुप्पट भावाने विक्री सुरू केली आहे.
सामान्य ग्राहक मात्र चांगलाच वेठीस धरला जात आहे. भाजीपाला विक्रेत्यांनी एवढी दबंगगिरी वाढली की अनेक प्रकारच्या भाजीपालामध्ये दीडसे ते चारशे टक्के एवढा नफा कमावला जात आहे. त्यामुळे महागईच्या काळात भाजीपाल्यांचे भाव चांगलीेच वधरल्यामुळे व हे भाव मनमर्जीने वाढविल्या जात असल्यामुळे सामान्य नागरिकांच्या डोळ्यात मात्र पाणी येत आहे. कांदा नागरिकांच्या डोळ्यात पाणी आणत आहे. गुरुवारी अमरावती बाजार समितीत फेरफटका मारला असता बुधवारी पांढऱ्या कांद्याची आवक, ३००किंटल एवढी झाली होती. या कांद्याला किंटलमागे कमीत कमी ४०० रुपये व जास्तीत जास्त ६००रुपये भाव मिळाला. लाल कांद्याची आवक १००किंटल झाली तर हा कांद्याला ठोक भावात ३०० ते ५०० रुपये प्रतिक्विंटल दर मिळाले. परंतु हर्रास झाल्यानंतर भाजीपाला विक्रेते संगनमताने भाववाढ करून ठोकमध्ये ४ रुपये, तर चिल्लर भाव १० ते १२ रुपये किलोने विक्री सुरू आहे. त्यामुळे ग्राहकांची ही शुध्द लूट असून यातून चिल्लर भाजीपाला दीडशे ते दोनशे पट एवढा नफा कमावला जात आहे. अमरावतीत ५०० च्या वर किरकोळ भाजीविक्रेते आहेत. ६०० ते ७०० फेरीवाले भाजीेपाला विक्री करतात. त्यामुळे या व्यवसायातून रोज कोट्यवधी रुपयांची खरेदी विक्री होते. जर अशाप्रकारे भाजीपाला विक्रेत्यांकडून कृत्रिम लूट होत असेल तर यावर नियंत्रण कुणाचे, असा प्रश्न पडत आहे. मात्र जो शेतकरी काबाडकष्ट करून माल पिकवितो. त्याला बाजारपेठेत पाहिजे तसा भाव मिळत नाही. व्यापारी त्याचा भाव पाडतात. त्यामुळे एकीकडे शेतकरी हवालदिल होत आहे व दुसरीकडे मोठे व्यापारी भाव पाडण्याचा घाट रचत आहेत. दुसरीकडे भाजीविक्रे ते प्रंचड भाववाढ करून सामान्य नागरिकांना वेठीस धरण्याचा गोरखधंदा करीत आहे. कांदा हा दैनंदिन जीवनातला महत्त्वाचा घटक असल्यामुळे नागरिकांना दामदुप्पट भाव देऊन तो विकत घ्यावाच लागतो. त्यामुळे विक्रेते याचा गैरफायदा घेत आहेत.२
ग्रामीण भागातील कांद्याला मागणी
कांदेयाची आवक सध्या चांगली आहे. पूर्वी नाशिकचा कांदा यायचा. आता अंजनगाव, परतवाडा, चांदूरबाजार, अचलपूर भागातील कांदा अमरावतीत दाखल होत आहे. पांढऱ्या कांद्याची ३०० किंटल तर लाल कांद्याची १०० क्विंटल रोज आवक होत आहे. मात्र शेतकऱ्यांच्या कांद्याला चांगला भाव मिळत नसल्याची ओरड आहे.