येवदा येथे दोन गटांत सशस्त्र हल्ला
By Admin | Updated: June 28, 2014 00:21 IST2014-06-28T00:21:15+5:302014-06-28T00:21:15+5:30
कवेलू नेण्याच्या वादातून दोन गटांत सशस्त्र हल्ला झाला. दोन्ही गटातील सदस्यांनी लोखंडी कोपईने एकमेकांना मारुन जखमी केल्याची ही घटना...

येवदा येथे दोन गटांत सशस्त्र हल्ला
येवदा : कवेलू नेण्याच्या वादातून दोन गटांत सशस्त्र हल्ला झाला. दोन्ही गटातील सदस्यांनी लोखंडी कोपईने एकमेकांना मारुन जखमी केल्याची ही घटना शुक्रवारी सकाळी १० वाजताच्या सुमारास स्थानिक रामनगर भागात घडली. याप्रकरणी येवदा पोलिसांनी चौघांना ताब्यात घेतले आहे.
पोलीस सूत्रानुसार, येवदा येथील रामनगर भागातील रहिवासी राम दशरथ भालतडक यांच्याशी कवेलू नेण्याच्या कारणावरुन तिडके कुटुंबातील दिगंबर तिडके, त्यांचे भाऊ विकास तिडके, विलास तिडके, पांडुरंग तिडके, दामोधर तिडके, नंदू तिडके व संतोष तिडके यांनी त्यांना लोखंडी सलाख व कोपईने मारहाण करुन जखमी केले. या घटनेची परस्परविरोधी तक्रार विलास रामकृष्ण तिडके यांनी येवदा पोलीस ठाण्यात दिली आहे. यात राम दशरथ भालतडक, वनमाला दशरथ भालतडक यांनी शिवीगाळ करुन कोपईने मारहाण केल्याचे म्हटले आहे. येवदा पोलिसांनी तक्रारीवरुन दोन्ही गटातील आरोपींविरुध्द गुन्हे दाखल करुन चार आरोपींना अटक केली आहे. (वार्ताहर)