शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

चिखलदऱ्यात कुऱ्हाडीचे घाव घालून एकाची हत्या; परिजनांचा आक्रोश, दोन मुले पित्याला मुकली

By प्रदीप भाकरे | Updated: November 4, 2022 17:00 IST

शेतात गुरे चारण्याच्या पैशांवरून वाद; आरोपीस अटक

चिखलदरा (अमरावती) : शेत गुरे चराईसाठी दिले, त्याचे तीन हजार रुपये दिले नसल्याच्या वादातून दारूच्या नशेत कुऱ्हाडीने डोक्यासह तोंडावर सपासप वार करून हत्या करण्यात आल्याची घटना तालुक्यातील जामली आर येथे सकाळी ११ वाजता घडली. या घटनेने पंचक्रोशीत एकच खळबळ उडाली आहे.

पोलीस सूत्रांनुसार, ईश्वर रमेश चव्हाण (३२, रा. जामली आर) असे मृताचे नाव आहे. हत्याप्रकरणी आरोपी हिरालाल रामा जामूनकर (५९, रा. जामली आर) याला पोलिसांनी ताब्यात घेतले. घटनेत एकापेक्षा अधिक आरोपी असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

ईश्वर चव्हाण हा गवळी समाजाचा असून त्याचा दूध व पशुपालनाचा व्यवसाय आहे. आरोपी हिरालाल जामूनकर याचे शेत त्याने पाळीव गुरांच्या चराईसाठी तीन हजार रुपयात घेतले होते. ही रक्कम मागितल्यावरसुद्धा दिली नसल्याने दोघांमध्ये वाद झाला. शुक्रवारी सकाळी ११ वाजता दोघे दारूच्या नशेत असताना आरोपी हिरालालने कुऱ्हाडीने वार करून ईश्वरची हत्या केली.

घटनेची माहिती मिळताच चिखलदरा पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक शहाजी रूपनर, उपनिरीक्षक दिनेश तायडे, जमादार विनोद ईसळ, प्रभाकर चव्हाण, अर्जुन केंद्रे, श्रीकांत खानंदे, आनंद देवकते, आशिष वरघड, संदीप देवकते आदींच्या चमूने घटनास्थळी जाऊन पंचनामा केला व आरोपीला अटक केली. कुटुंबावर कोसळले आभाळ, दोन मुले पित्याला मुकली

हत्या झाल्याचे कळताच घटनास्थळी गावातील व परिसरातील नागरिकांनीही एकच गर्दी केली होती. परिजनांचा आक्रोश होता. मृतक ईश्वर चव्हाण याला आठ व दहा वर्षाची दोन मुले आहेत. ईश्वर चव्हाण हा गुरुवारी अचलपूर येथील बाजार समितीत शेतातून निघालेले सोयाबीन विकून आला होता. त्याचे पैसेसुद्धा त्याच्याजवळ होते. आरोपी व मृतामध्ये नेमका वाद शेतावरून झाला की अन्य काही कारण, यासंदर्भात पोलीस तपास करीत आहेत. वृत्त लिहिस्तोवर पंचनामा सुरू होता.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीChikhaldaraचिखलदराAmravatiअमरावती