शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

बंगाली कामगारांमध्ये बांगलादेशी नागरिक आहेत का? शोधमोहीम सुरु

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 24, 2025 13:09 IST

Amravati : क्राइम युनिट दोनकडे जबाबदारी, आस्थापना तपासणार

लोकमत न्यूज नेटवर्क अमरावती : शहर पोलिस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी यांनी शहरातील विविध आस्थापनेत काम करणाऱ्या बंगाली कामगारांची सर्चिग हाती घेतली आहे. या मोहिमेला गुरुवारपासून सुरुवात करण्यात आली आहे.

शहरातील ज्या व्यावसायिक संकुलात, आस्थापनेत, कारखान्यात बंगाली कामगार काम करीत आहेत, त्यात कुणी बांगलादेशी आहे का? याचा शोध त्यातून घेतला जात आहे. त्यांचे आधार कार्ड खरे की बनावट तेदेखील आधार आयडेंटीफिकेशनद्वारे तपासले जात आहे. क्राइम युनिट दोनचे पोलिस निरीक्षक बाबाराव अवचार यांच्या नेतृत्वातील पोलिस पथकाने गुरुवारी रहाटगाव रोडवरील एका बिझनेस पार्कमधील रेडिमेड कापड निर्मितीच्या कारखान्यांत जाऊन तेथील बंगाली कामगारांची कसून तपासणी केली. त्यांचे ठसे आधार कार्डशी जुळतात की कसे, ते देखील प्राधान्याने पाहिले जात आहे.

केंद्रीय गृहमंत्रालयाने महाराष्ट्र सरकारला बेकायदेशीर बांगलादेशी घुसखोरांविरोधात कठोर कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत. तर दुसरीकडे सीपी नविनचंद्र रेड्डी यांनी सखोल निरिक्षणाअंती शहरात काम करत असलेल्या त्या बंगाली कामगारांची तपासणी मोहिम हाती घेतली आहे. शहरातील ज्वेलरी व गारमेंटमध्ये काम करणाऱ्यांसह हॉकर्स म्हणून काम करणाऱ्या बंगाली कामगारांची झाडाझडती घेण्यात येत आहे.

केंद्रीय गृहमंत्रालयाने दिले निर्देश अभिनेता सैफ अलीवर हल्ला करणारा बांगलादेशी निघाल्याने केंद्रीय गृह मंत्रालयाने त्याची गंभीर दखल घेतली आहे. त्याअनुषंगाने केंद्रीय गृह मंत्रालयाने राज्याचे मुख्य सचिव व पोलिस महासंचालकांना बांगलादेशी घुसखोरांविरूद्ध कारवाईसाठी पत्र पाठविले आहे.

अकोला, अंजनगावात बांग्लादेशी? 

  • बनावट प्रमाणपत्रांच्या आधारे अकोला जिल्ह्यातून सुमारे १५ हजार बांगलादेशींना जन्माचे दाखले दिल्याचा आरोप भाजप नेते किरीट सोमय्या यांनी दि.२२ जानेवारी रोजी केला आहे. 
  • अंजनगाव सुर्जी तहसील कार्यालयातून सुमारे १२०० बांगलादेशींना बनावट कागदपत्रांच्या आधारे जन्मदाखले दिले गेले, असा आरोपदेखील सोमय्या यांनी केला होता. 
  • उद्धवसेनेचे जिल्हाप्रमुख सुनील खराटे यांनी डिसेंबर २०२४ मध्ये अमरावतीमधील बांगलादेशींना शोधून काढा, असे निवेदन पोलिस उपायुक्तांना दिले होते. त्या सर्व पार्श्वभूमिवर सीपींनी तक्रार निवारण व गुन्हे निर्गती अभियाना नंतर ही मोहिम हाती घेतली आहे.

९४ हून अधिक बंगाली कामगारांची झाडाझडतीनांदगाव पेठ रोडवरील तीन-चार व्यावसायिक संकुले, दोन्ही एमआयडीसी व ते बंगाली मजूर राहत असलेल्या अन्सारनगर, लालखडी भागातही ती मोहीम राबविली जाईल.

"शहरातील ज्वेलरी व गारमेंट इंडस्ट्रिजमध्ये काम करणारे व काही हॉकर्सदेखील बंगाली आहेत. त्यांचे आधार कार्ड खरे की बनावट ती तपासणी केली जात आहे. ती मोहिम पुढील काही दिवस निरंतर सुरू राहिल." - नवीनचंद्र रेड्डी, पोलिस आयुक्त

टॅग्स :Amravatiअमरावती