जीवन प्राधिकरणची अरेरावी पद्धतीने वसुलीही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2018 22:42 IST2018-03-18T22:42:05+5:302018-03-18T22:42:05+5:30
शहानूर धरणातून होणारा पाणीपुरवठा चार वर्षांपासून अपुरा असल्याने शहरातील सुर्जी, बालाजीनगर, शहापूरा, गणेशनगर, तेलीपुरा, देशमुखपुरा भागात पाणी मिळत नाही.

जीवन प्राधिकरणची अरेरावी पद्धतीने वसुलीही
आॅनलाईन लोकमत
अंजनगाव सुर्जी : शहानूर धरणातून होणारा पाणीपुरवठा चार वर्षांपासून अपुरा असल्याने शहरातील सुर्जी, बालाजीनगर, शहापूरा, गणेशनगर, तेलीपुरा, देशमुखपुरा भागात पाणी मिळत नाही. शहरवासीयांना पाण्याचा वापर नसतानाही जीवन प्राधिकरणकडून फ्लॅट रेटच्या नावाखाली बिले देण्यात आली. यामध्ये मीटर सुरू असताना फ्लॅट रेटचे बिल देणे, दर महिन्याला नियमित देयक भरणाऱ्यांना घरात एक व्यक्ती असताना ९०० रुपये बिल देणे त्यामुळे या कारभाराला शहरवासी वैतागले आहेत. ग्राहकांच्या तक्रारीचे निवारण न करता चुकीच्या पद्धतीने वसुली सुरू केली. सहा दिवसांपूर्वी शहरातील बारगनपुरा, सुर्जी भागातील पाणी पुरवठा बंद केल्यामुळे ज्यांनी नियमित देयके भरली त्यांनाही त्रास सहन करावा लागला. याबाबत आ. रमेश बुंदिले यांच्या उपस्थितीत तहसीलदार योगेश कुंभेजकर यांना ग्राहक मंचाचे आनंद संगई, नगराध्यक्ष कमलकांत लाडोळे, मनोहर मुरकुटे, जयेश पटेल, संजय नाठे, संतोष गोलाईत आदींनी निवेदन दिले.