शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

अमरावती महानगरात मोबाइल कंपन्यांची मनमानी; २१७ टॉवर अनधिकृत, कोट्यवधी रुपये थकीत

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 21, 2025 12:05 IST

८३ टॉवर उभारणीसाठी मंजूरी प्रदान : उर्वरित टॉवर हे नियमबाह्य असल्याचे प्रशासनाकडून शिक्का मोर्तब

लोकमत न्यूज नेटवर्क अमरावती : मंजुरी एका मोबाइल टॉवरची, पण त्या टॉवरवर एकापेक्षा अधिक मोबाइल कंपन्यांनी परस्पर टॉवर उभारण्याच्या धक्कादायक प्रकाराने आयुक्त सचिन कलंत्रे यांनादेखील 'शॉक' बसला आहे. महानगरात मोबाइल कंपन्याचे 'टॉवर पे टॉवर' यात कोट्यवधी रुपयांचे उत्पन्न बुडाले असून, कंपन्या मात्र 'मालामाल' होत आहेत. साधारणतः २१७ अनधिकृत मोबाइल टॉवर असल्याची बाब पुढे आली आहे.

मोबाइल टॉवर उभारणी करण्यासाठी राज्य शासनाने नियमावली निश्चित केली आहे. असे असताना शहरात मंजुरी न घेता तब्बल २१७ अनधिकृत मोबाइल टॉवरची उभारणी केली असेल, तर ही कंपन्यांची अरेरावी म्हणावी लागेल. किंबहुना निवासी क्षेत्रात मोबाइल टॉवर नको, अशा तक्रारी अनेकदा नागरिकांकडून येतात. तथापि, या तक्रारींचा निपटारा न करता मोबाइल कंपन्यांना अभय दिला जातो. 

कोर्टाच्या नावे मोबाइल कंपन्यांचे चांगभले महापालिका वा अन्य यंत्रणांची परवानगी न घेता परस्पर मोबाइल टॉवर उभारणीचा सपाटा अमरावतीत सुरू आहे. प्रशासनाने कारवाई अथवा दंड वसुलीची प्रक्रिया आरंभली, तर या निर्णयाविरोधात मोबाइल कंपन्या न्यायालयात धाव घेतात. त्यानंतर हे प्रकरण न्यायालयात 'तारीख पे तारीख' असे सुरू झाले की, मोबाइल कंपन्यांनी 'टॉवर पे टॉवर' असा कारभार सुरू होतो.

पाचही झोननिहाय मालमत्ता कर वसुलीचे निर्देश 

  • महापालिका आयुक्त सचिन १ कलंत्रे यांनी १३ जानेवारी रोजी उत्पन्न वाढीच्या अनुषंगाने आढावा घेतला असता, मोबाइल टॉवर मंजुरीत प्रचंड गोंधळ असल्याची बाब त्यांच्या निदर्शनास आली.
  • आयुक्तांनी पाचही झोननिहाय मोबाइल टॉवरवर कार्यवाही करून मालमत्ता कर वसूल करण्याचे निर्देश सहायक आयुक्तांना दिलेत. तसेच, मोबाइल टॉवरसंदर्भात कार्यवाहीचा अहवाल सादर करण्याच्या सूचना आयुक्तांनी दिल्या होत्या.
  • महापालिका आयुक्त कलंत्रे ६३ यांनी १३ जानेवारी रोजी उत्पन्न बाबत आढावा घेतला असता अनधिकृत मोबाइल टॉवर उभारणीचे बिंग फुटले.
  • अनधिकृत मोबाइल टॉवरच्या ८३ अनुषंगाने कंपन्यांकडून ४ ते ५ कोटी रुपये थकीत महापालिकेला उत्पन्न अपेक्षित आहे. मात्र, यासंदर्भात ठोस पाऊले उचलले जात नाही.

"महापालिकेत आतापर्यंत केवळ ८३ मोबाइल टॉवर उभारणीची मंजूरी दिली आहे. उर्वरित टॉवर हे अनधिकृत असून, १ जानेवारीपासून ऑनलाइन मंजुरीची प्रक्रिया आंरभली आहे. एका मोबाइल टॉवरपासून लाख ते दीड लाखाचे उत्पन्न मिळते." - घनश्याम वाघाडे, एडीटीपी, मनपा

टॅग्स :Amravatiअमरावती