शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

महावितरणच्या ७५७ उपकेंद्र सहाय्यकाच्या नियुक्त्या रखडल्या

By गणेश वासनिक | Updated: June 26, 2023 17:54 IST

उपमुख्यमंत्री तथा उर्जामंत्री यांनी शब्द न पाळल्याचा उमेदवारांचा आक्षेप, कोरोनानंतर आरक्षण लागू करण्याचा निर्णय

अमरावती : राज्यात महावितरणच्या ७५७ उपकेंद्र सहाय्यक (ऑपरेटर)च्या नियुक्त्या रखडल्या आहेत. यात सत्ताधाऱ्यांची अनास्था असल्याचा आक्षेप उमेदवारांनी घेतला आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री तथा उर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांची वारंवार भेट घेतली. मुंबईच्या आझाद मैदानावर २० दिवस आंदोलन केले तरीही हा प्रश्न सुटत नसल्याचे वास्तव आहे.

महावितरणने २३०० उपकेंद्र सहाय्यक (ऑपरेटर) पदभरतीसाठी २०१९ मध्ये परीक्षा घेतली. १०२९ मुलांची यादी जाहीर केली. त्यापैकी ७५७ उमेदवारांना नियुक्त्या दिल्या नाहीत. कोरोना आणि सत्ता स्थापनेमुळे निवड यादी आणि प्रतीक्षा यादीचा निकाल जून २०२० मध्ये जाहीर झाला. दरम्यान ९ सप्टेबर २०२० रोजी मराठा आरक्षणाला स्थगिती मिळाली. एसईबीसी, ईडब्ल्यू एस पात्र उमेदवार वगळून नियुक्त्या देण्यात आल्या आहेत. मात्र आता महावितरणणने २०२२ पासून समांतर आरक्षण लागू केले. त्यामुळे ७५७ मुलांना बेरोजगार झाले असून, चार वर्षांपासून यादी पूर्ण होण्याची प्रतीक्षा आहे.

ना. फडणवीस यांनी २० डिसेंबर २०२२ ला नागपूर हिवाळी अधिवेशनात महावितरणमध्ये उपकेंद्र सहाय्यक पदाच्या सात हजार पदे रिक्त आहे. त्यामुळे जे प्रतीक्षा यादीतील ७५७ उमेदवार बाहेर पडले त्यांना नियुक्त्या दिल्या जातील, असे आश्वासीत केले होते. मात्र आता महावितरणने प्रतीक्षा यादीतील उमेदवार नियमात बसत नसल्याचा मार्ग काढून प्रतीक्षा यादीतील उमेदवारांवरील अन्याय दूर करावा, अशी मागणी उमेदवार विवेक गजभिये यांनी केली आहे. या मागणीचे निवेदन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमत्रीं देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पाठविले आहे.

टॅग्स :mahavitaranमहावितरणjobनोकरी