अमरावती जिल्हाध्यक्ष पदी प्रवीण मनोहर यांची नियुक्ती, यशोमती ठाकूरांकडून औक्षण करून स्वागत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 17, 2022 18:52 IST2022-04-17T18:51:42+5:302022-04-17T18:52:03+5:30

काँग्रेसच्या अनुसूचित जाती विभागाच्या पाच जिल्हाध्यक्ष पदावर नियुक्या

Appointment of Praveen Manohar as District President of Amravati, welcomed by Minister Yashomati Thakur | अमरावती जिल्हाध्यक्ष पदी प्रवीण मनोहर यांची नियुक्ती, यशोमती ठाकूरांकडून औक्षण करून स्वागत

अमरावती जिल्हाध्यक्ष पदी प्रवीण मनोहर यांची नियुक्ती, यशोमती ठाकूरांकडून औक्षण करून स्वागत

अमरावती : अखिल भारतीय कॉंग्रेस कमिटी अनुसूचित जाती विभागाचे राष्ट्रीय अध्यक्ष राजेश लिथोलिया यांनी राज्यातील अनुसूचित जाती विभागाच्या चार ग्रामीण अध्यक्षांची नियुक्ती केली. यात प्रवीण मनोहर (अमरावती) , राहुल ओहोळ ( पुणे) , ॲड.गजानन खरात ( सोलापूर ), प्रफुल्ल खापर्डे (चंद्रपूर) , संजय तडके ( सातारा) यांचा समावेश आहे.

अनुसूचित जाती विभाग,अल्पसंख्यांक विभाग, इतर मागासवर्गीय विभाग राष्ट्रीय समन्वयक के. राजू. प्रदेशाध्यक्ष नाना पटोले,विभागाचे प्रदेशाध्यक्ष सिध्दार्थ हत्तीअंबीरे यांनी विभागाच्या सक्षमीकरण करण्यावर लक्ष केंद्रित केले आहे.प्रवीण मनोहर यांच्या अमरावती जिल्हाध्यक्षपदी नियुक्तीबद्दल ना. ॲड. यशोमती ठाकूर, डॉ.सुनील देशमुख,जिल्हाध्यक्ष अनिरुध्द देशमुख,आमदार बळवंत वानखडे, प्रा.वीरेंद्र जगताप व प्रदेश महासचिव ॲड.दिलीप एडतकर, किशोर बोरकर यांचे कौतुक केले आहे.

Web Title: Appointment of Praveen Manohar as District President of Amravati, welcomed by Minister Yashomati Thakur