अमरावतीमध्ये आणखी एक पॉझिटिव्ह, एकाचा मृत्यू; मृतांची संख्या १३

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2020 18:19 IST2020-05-14T18:17:42+5:302020-05-14T18:19:07+5:30

अमरावती येथील क्लस्टर हॉटस्पॉटलगत खरकाडीपुऱ्यातील एका २८ वर्षीय महिलेचा अहवाल गुरुवारी पॉझिटिव्ह आल्याने जिल्ह्यात कोरोनाग्रस्तांची संख्या आता ९० वर पोहोचली आहे.

Another positive in Amravati, one died | अमरावतीमध्ये आणखी एक पॉझिटिव्ह, एकाचा मृत्यू; मृतांची संख्या १३

अमरावतीमध्ये आणखी एक पॉझिटिव्ह, एकाचा मृत्यू; मृतांची संख्या १३

ठळक मुद्देकोरोनाग्रस्तांची संख्या ९० मृत १३, संक्रमणमुक्त ५६, २२ जणांवर उपचार सुरू

लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : येथील क्लस्टर हॉटस्पॉटलगत खरकाडीपुऱ्यातील एका २८ वर्षीय महिलेचा अहवाल गुरुवारी पॉझिटिव्ह आल्याने जिल्ह्यात कोरोनाग्रस्तांची संख्या आता ९० वर पोहोचली आहे. ५ मे रोजी पॉझिटिव्ह झालेल्या ताजनगरातील ४४ वर्षीय व्यक्तीचा गुरुवारी सकाळी उपचारादरम्यान मृत्यू झाल्याने मृतांची संख्या आता १३ झालेली आहे.
पॉझिटिव्ह निष्पन्न झालेली ती महिला कोरोनाबाधितांच्या संपर्कात आल्याने क्वारंटाईनमध्ये होती. तिचा स्वॅब तपासणीसाठी पाठविलेला अहवाल गुरुवारी दुपारी पॉझिटिव्ह आल्याने त्यांना कोविड रुग्णालयात हलविण्यात आले आहे. दरम्यान एका ४४ वर्षीय संक्रमित डॉक्टरचा गुरुवारी सकाळी उपचारादरम्यान मृत्यू झाला. बाधिताच्या संपर्कात आल्याने त्यांना क्वारंटाईन करण्यात आले. ५ मे रोजी त्यांचा स्वॅब पॉझिटिव्ह आल्याने त्यांना येथील कोविड रुग्णालयात हलविण्यात आले होते. त्यांचा उपचारादरम्यान गुरुवारी मृत्यू झाल्याचे जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी सांगितले.

Web Title: Another positive in Amravati, one died