शहरं
Join us  
Trending Stories
1
"वक्तव्य होत असतात, राम सर्वांचे आणि राष्ट्र..."; RSS नेते इंद्रेश कुमार यांच्या विधानावर बाबा रामदेव यांची पहिली प्रतिक्रिया
2
सर्वसामान्यांना मोठा दिलासा, आजपासून 'या' ५४ अत्यावश्यक औषधांच्या किमती घटणार
3
ठाकरे गटाला मोठा धक्का; माजी मंत्र्यांचा शिवसेना शिंदे गटात प्रवेश
4
काँग्रेसच्या पक्षसंघटनेत मोठे फेरबदल होणार? भविष्यातील रणनीतीच्या दृष्टीने मोठं पाऊल उचलणार
5
PHOTOS : नेपाळच्या 'युवा' संघाचा झंझावात; आफ्रिकेने तोंडचा घास पळवताच अश्रू अनावर
6
WHAT A MATCH! आफ्रिकेला आशियाई संघानं घाम फोडला; मोठा उलटफेर होण्यासाठी १ धाव कमी पडली
7
न्यूझीलंडचा ८८ चेंडू राखून विजय! वर्ल्ड कपमधून बाहेर पडले; पण अखेर विजयाचे खाते उघडले
8
कॅलिफोर्नियातील PNG ज्वेलर्सवर भरदिवसा दरोडा, २० दरोडेखोर आले, दोन मिनिटांत सराफा दुकान साफ केले
9
आजचे राशीभविष्य - शनिवार १५ जून २०२४; यश, कीर्ती आणि प्रतिष्ठेत वाढ होईल, आर्थिक योजना चांगल्या प्रकारे पूर्ण कराल
10
40 ALL OUT! वर्ल्ड कपमधून बाहेर पडले; पण न्यूझीलंडच्या गोलंदाजांनी नवख्या संघाला लोळवलं
11
दहशतवाद्यांचे टार्गेट काश्मीरऐवजी जम्मू, पर्यटकांत भीती निर्माण करण्याचा प्रयत्न
12
दीड टक्के मते वाढवा, विधानसभा आपलीच; देवेंद्र फडणवीसांनी दिला विश्वास
13
YO-YO Test मध्ये पास न होणाऱ्यांना संघातून वगळणं चुकीचंच; गंभीरचं रोखठोक मत
14
"ज्यांनी रामाच्या भक्तीचा संकल्प केला ते सत्तेत आणि विरोध करणारे…’’, RSS नेते इंद्रेश कुमार यांचा यूटर्न 
15
भाजप वादग्रस्त विधेयके ठेवू शकते थंडबस्त्यात, संसद अधिवेशनात 'सहमती' हा नवीन मंत्र
16
केंद्र सरकारने काढले नाफेडचे कांदा दरनिश्चितीचे अधिकार
17
परस्पर संवाद, मुत्सद्देगिरीतूनच शांततेचा मार्ग जातो, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं विधान
18
Chhagan Bhujbal : अजित पवार गटात नाराज,शरद पवारांसोबत पुन्हा परत जाणार का? छगन भुजबळांनी थेटच सांगितलं
19
शीना बोराच्या जळालेल्या हाडांचे अवशेष गायब, हाडे सापडत नसल्याची सीबीआयची कोर्टात कबुली
20
सोशल मीडियावर वाढली अश्लीलता; मुले बिघडली, कुटुंबातील संवाद झाला कमी

स्क्रब टायफसचे आणखी दहा रूग्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 08, 2018 10:10 PM

जिल्ह्यात स्क्रब टायफस या जीवघेण्या आजाराचे रूग्णालयात आणखी ९, तर वरुड तालुक्यात १ रूग्ण आढळले आहेत. आता स्क्रब टायफसच्या पॉझिटिव्ह व संशयित रूग्णांची संख्या ३० वर पोहचली आहे. जिल्हा आरोग्य यंत्रणेने सतर्क राहणे गरजेचे असल्याचे मत तज्ज्ञ डॉक्टरांनी व्यक्त केले आहे.

ठळक मुद्देभीती कायम : एकूण रुग्णसंख्या ३० च्यावर, आरोग्य यंत्रणा अलर्ट

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : जिल्ह्यात स्क्रब टायफस या जीवघेण्या आजाराचे रूग्णालयात आणखी ९, तर वरुड तालुक्यात १ रूग्ण आढळले आहेत. आता स्क्रब टायफसच्या पॉझिटिव्ह व संशयित रूग्णांची संख्या ३० वर पोहचली आहे. जिल्हा आरोग्य यंत्रणेने सतर्क राहणे गरजेचे असल्याचे मत तज्ज्ञ डॉक्टरांनी व्यक्त केले आहे.नव्याने आढळून आलेल्या रूग्णांमध्ये आठ रूग्ण राजापेठ येथील श्रीकृष्ण हॉस्पिटलमध्ये डॉ.मनोज निचत यांच्याकडे उपचार घेत आहेत. सदर रूग्ण हे चार दिवसांतील असल्याने स्क्रब टायफसची वाढती संख्येमुळे नागरिकांमध्ये भीती पसरली आहे.यापूर्वी येथील पीडीएमसी हॉस्पिटलमध्ये ६ रूग्ण आढळले होते. खासगी डॉक्टारांकडे उपचार घेणाऱ्या सात रूग्णांना नागपूर येथे उपचारासाठी हलविले होते. यापैकी अनेकांचे रक्त नमुने तपासणीत इलायझा कनर्फम फॉर स्क्रब टायफस चाचणी पॉझिटिव्ह आली. स्क्रब टायफस आजाराच्या निदानासाठी प्रयोगशाळेत सदर चाचणी झाली होती. जिल्हा हिवताप अधिकारी कार्यालयाच्यावतीने सदर रक्तनमुने घेऊन ते जीएमसी नागपूर येथे तपासणीसाठी पाठविले. मात्र इलायझा कनर्फम ही चाचणी महागडी असल्याने काही डॉक्टरांनी स्क्रब टायफसची लक्षणे आढळल्यानंतर आयजीएम चाचणीनंतर उपचार सुरू केले.या गावांतील आहेत रूग्णसाई नगर अमरावती १, पिंपळगव्हाण ता. नांदगाव खंडेश्वर १, बेरोळा ता. नांदगाव खंडेश्वर १, घुईखेड ता. चांदूररेल्वे १,लाडेगाव ता. कारंजा १, रामा साऊर ता. भातकुली १, नांदगाव खंडेश्वर १, पोहरा ता. अमरावती १, बग्गी जवरा ता. चांदूररेल्वे १, आमला ता. चांदूररेल्वे १ या भागामध्ये नवीन स्क्रब टायफसचे रूग्ण आढळून आले असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली.पुसला, जामगाव येथेही आढळले स्क्रब टायफसचे रुग्णवरूड : तालुक्यातील मांगरुळी येथे स्क्रब टायफसने पंकज श्रीराव या ३५ वर्षीय शेतकºयाचा मृत्यू झाल्यानंतर आरोग्य प्रशासनाला जाग आली. सर्वेक्षणासह पत्रके वाटून जनजागृतीचे प्रयत्न सुरू आहे. मात्र, रुग्णांची संख्या वाढत असल्याचे दिसून येत आहे. वरूडच्या एका खासगी दवाखान्यात पुसला येथील दोन रुग्णांच्या रक्तचाचण्या स्क्रब टायफस पॉझिटिव्ह आल्याने ते उपचार घेत आहेत. ग्रामीण रुग्णलयात जामगाव (खडका) येथील एक रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आला. त्याला नागपूरला उपचारार्थ पाठविण्यात आले. अशाप्रकारचे अनेक रुग्ण तालुक्यात असण्याची शक्यता व्यक्त होत आहे. दरम्यान, या आजाराची सर्व शासकीय रुग्णालयांमध्ये औषधोपचार उपलब्ध असून, नागरिकांनी घाबरून जाऊ नये, असा सल्ला तालुका वैद्यकीय अधिकारी अमोल देशमुख यांनी दिला आहे.स्क्रब टायफसचे आणखी आठ रूग्ण आढळले आहे. त्यांच्यावर उपचार सुरू आहे. आतापर्यंत आलेल्या १३ पैकी ११ रूग्णांची इलायझा कर्न्फम झाले असून दोन रुग्ण संशयित आहेत.- मनोज निचत,एमडी मेडिसीन, अमरावतीगवतांवर व झाडांवर फवारणी करण्याच्या सूचना देण्यात आल्यात. आजार नियंत्रणासाठी उपाययोजना सुरू आहे. उपजिल्हा रूग्णालयाच्या अधिक्षकांना सर्तकतेच्या इशारा दिला आहे.- श्यामसुंदर निकम, जिल्हा शल्यचिकित्सक