मेळघाटात अंनिसद्वारा जनजागृती अभियान

By Admin | Updated: May 30, 2015 00:35 IST2015-05-30T00:35:15+5:302015-05-30T00:35:15+5:30

आदिवासी विकास विभागाच्यावतीने एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी धारणी यांच्या कार्यक्षेत्रातील..

Anna Hazara Janajagruti Abhiyan in Melghat | मेळघाटात अंनिसद्वारा जनजागृती अभियान

मेळघाटात अंनिसद्वारा जनजागृती अभियान

गावागावांत सभा : आदिवासी विकास विभागाचे महत्त्वपूर्ण पाऊल
अमरावती : आदिवासी विकास विभागाच्यावतीने एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी धारणी यांच्या कार्यक्षेत्रातील मेळघाट परिसरात अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या जिल्हा शाखेद्वारे आयोजित ‘आरोग्य विषयक अंधश्रद्धा निर्मूलन जाणिव जागृती कार्यक्रमांना मेळघाटातील जनतेचा भरघोस प्रतिसाद मिळत आहे.
आदिवासींमधील आरोग्य विषयक अंधश्रद्धा दूर करण्यासाठी तसेच अनिष्ट व अघोरी उपचारांबाबत जनजागृती करण्यासाठी हे अभियान राबविण्याचे राज्य शासनाने उचललेले हे एक महत्वाचे आणि क्रांतीकारी पाऊल ठरत आहे.
आरोग्य विषयक अंधश्रद्धा निर्मूलन जाणीव जागृती अभियानाची सुरुवात पालकमंत्री प्रवीण पोटे यांनी ५ मे रोजी अभियान रथाला हिरवी झेंडी दाखवून केली. ७ मे रोजी चिखलदरा तालुक्यातील माखला येथून जनजागृती कार्यक्रमाला सुरुवात झाली. ७ मे ते १७ जून २०१५ पर्यंत एकूण ८४ अतिदुर्गम गावांमध्ये हे अभियान पोहोचणार आहे. दरदिवशी २ गावांमध्ये २ जागृती पथके प्रबोधन करीत आहे. आतापर्यंत माखला, भवई, पिली, चुनखडी, माडीझडप, केली, केशरपूर, चिखली, पाटकाऊ, बोरीखेडा, राक्षा, तारूबांदा, अढाव, हरिसाल, कोटा, चौराकुंड, नांदुरी, ढाकणा, सावऱ्या, गडगा (भांडूम), बिजुधावडी, तातरा, झिलांगपाटी, बोड, बेदाबल्ला, बारु, टोली, घुटी, मांडू, आकी, झापल, बोबदो, टिटंबा, मोगर्दा, सावऱ्या, राणीतंबोली, रत्नापूर, बाबंदा अशा एकूण ३९ गावांमध्ये जनप्रबोधन सभा झाल्या आहेत.
या अभियानासाठी अपर आयुक्त अशोक आत्राम, उपायुक्त महादेव रार्घोते, प्रकल्प अधिकारी धारणी, नितीन तायडे, सहायक प्रकल्प अधिकारी पी.बी.पोळ, सहायक प्रकल्प अधिकारी एन.के. सोनकांबळे, अभियानाचे संयोजक मंगेश खेरडे, कार्यक्रम संयोजक हरिष केदार हे विशेष लक्ष ठेऊन आहेत.
अभियानासाठी प्रत्येक गावातील सरपंच, पोलीस पाटील, आशा वर्कर, अंगणवाडी सेविका सहकार्य करीत आहेत. अभियानाचे मार्गदर्शक म्हणून गणेश हलकारे, राज्य संघटक दिलीप सोळंके, राजू खिराडे, नरेश कुऱ्हेकर, सुनील मुंदाणे, सुधाकर चिलात्रे हे प्रबोधन करीत आहेत तर सहाय्यक म्हणून राजेंद्र भांबोरे, अजय केने, अमित आकोटकर, नीलेश खंडारे, उज्ज्वल थोरात, पुरूषोत्तम दाहेदार, यशवंत मौड, विनोद वानखडे, श्याम नळकांडे, श्रीकांत भटुरकर, रवींद्र बुल, जीवन सरदार हे काम पाहत आहेत. (प्रतिनिधी)

Web Title: Anna Hazara Janajagruti Abhiyan in Melghat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.