अंजनगाव सुर्जीत शांतता समितीची बैठक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2021 04:14 IST2021-09-19T04:14:01+5:302021-09-19T04:14:01+5:30
अंजनगाव सुर्जी : येथील स्व. रायसाहेब मोतीसंगई सभागृहामध्ये आगामी गणेश विसर्जन कार्यक्रमप्रसंगी पोलीस विभागाकडून शांतता समितीची बैठक घेण्यात आली. ...

अंजनगाव सुर्जीत शांतता समितीची बैठक
अंजनगाव सुर्जी : येथील स्व. रायसाहेब मोतीसंगई सभागृहामध्ये आगामी गणेश विसर्जन कार्यक्रमप्रसंगी पोलीस विभागाकडून शांतता समितीची बैठक घेण्यात आली.
बैठकीत गणेश विसर्जन शांततेत करण्याचे आवाहन पोलीस प्रशासनाने केले. नगराध्यक्ष कमलकांत लाडोळे यांनी शहरात गणेश विसर्जनावेळी कोणताही अनुचित प्रकार घडणार नाही, अशी ग्वाही अधिकाऱ्यांना दिली तसेच सर्व गणेश मंडळांनी नगरपरिषदेने बनवलेल्या कृत्रिम तलावांमध्ये गणपतीचे विसर्जन करावे, असे आवाहन केले. बैठकीला अमरावती अप्पर पोलीस अधीक्षक श्याम घुगे, उपविभागीय अधिकारी महाजन, तहसीलदार अभिजित जगताप, महावितरण उपअभियंता संदीप गुजर, अंजनगाव सुर्जीचे ठाणेदार दीपक वानखडे, सहायक पोलीस निरीक्षक विशाल पोळकर, पोलीस पाटील, राजकीय पदाधिकारी, शहर व तालुक्यातील गणेशोत्सव मंडळाचे पदाधिकारी उपस्थित होते. संचालन पोलीस उपनिरीक्षक प्रदीप काईट, प्रास्ताविक पोलीस निरीक्षक दीपक वानखडे व आभार प्रदर्शन सहायक पोलीस निरीक्षक विशाल पोळकर यांनी केले.