शहरं
Join us  
Trending Stories
1
“आता येत्या २ महिन्यात एकनाथ शिंदे पुन्हा CM होतील असे वाटतेय”; कुणी केली भविष्यवाणी?
2
"मगरीचे अश्रू, बंगालचा अपमान...", मेस्सीच्या कार्यक्रमात गोंधळ; BJP-TMC मध्ये आरोप-प्रत्यारोप
3
डोंबिवलीत पुन्हा प्रदूषण; रस्त्यावर गुलाबी रंग; पर्यावरणमंत्री पंकजा मुंडे म्हणाल्या, 'तथ्ये तपासून कारवाई करू'
4
प्रवाशांनो… वंदे भारत, राजधानीने प्रवास करताय? ‘हा’ नियम अनिवार्य; अन्यथा तिकीट मिळणार नाही!
5
सिडकोच्या घरांमध्ये मोठी सूट; लॉटरीपूर्वीच किमती १० टक्क्यांनी घटल्या, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा मोठा निर्णय
6
जंगलात एक कोटींच्या शेळ्या सोडणे हास्यास्पद; वनमंत्र्यांच्या बिबट्यांच्या उपायांची अजित पवारांनी उडवली खिल्ली
7
'धन्यवाद तिरुवनंतपुरम'; थरूर यांच्या बालेकिल्ल्यात भाजपचा झेंडा! पंतप्रधान मोदींनी मानले केरळच्या जनतेचे आभार
8
केरळच्या राजधानीत भाजपाचा ऐतिहासिक विजय, डाव्या पक्षांचा अनेक वर्षांपासूनचा बालेकिल्ला ढासळला
9
साता जन्माची साथ ८ दिवसांत सुटली; नववधू बॉयफ्रेंडसोबत पसार, नवऱ्याची शोधण्यासाठी वणवण
10
“महापालिका निवडणुकीत युतीबाबत चर्चा करून एकत्र निर्णय बसून घेऊ”; अजित पवारांनी केले स्पष्ट
11
...तर थेट मुख्य सचिवांवरच हक्कभंग आणू; राहुल नार्वेकरांचा विधानसभेत संताप, नेमके काय घडले?
12
नवा ट्विस्ट! "पवन सिंहला धमकी दिली नाही, जे करतो ते..."; लॉरेन्स बिश्नोई गँगचा ऑडिओ व्हायरल
13
शरद पवार यांच्या वाढदिवसाच्या पार्टीत राहुल गांधी आणि गौतम अदानी आले आमने-सामने, त्यानंतर घडलं असं काही...
14
Lionel Messi : Video - "फ्रॉड करून गेला, १२ हजारांचं तिकीट..."; मेस्सीची झलक न दिसल्याने फॅन्स प्रचंड चिडले
15
लग्नाच्या नावाखाली अल्पवयीन मुलींचा सौदा; राज ठाकरेंच्या पत्रावर CM फडणवीस म्हणाले, "९० टक्के मुली परत आल्या"
16
“महाराष्ट्र विधानपरिषद देशासाठी आदर्श”; विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचे कौतुकोद्गार
17
टीम इंडियाचं नेमकं कुठं चुकतंय? गौतम गंभीरच्या रणनीतीवर रॉबिन उथप्पाची टीका
18
Mamata Banerjee : "मी माफी मागते"; मेस्सीच्या कार्यक्रमातील गोंधळ पाहून मुख्यमंत्री ममता बॅनर्जी नाराज
19
H-1B व्हिसाच्या नव्या नियमांवरुन ट्रम्पच गोत्यात, वॉशिंग्टन ते कॅलिफोर्नियापर्यंत १९ राज्यांनी कोर्टाचा दरवाजा ठोठावला
20
Lionel Messi: सॉल्ट लेक स्टेडियम तोडफोडप्रकरणी आयोजकाला अटक, प्रेक्षकांनाही तिकिटाचे पैसे परत मिळणार!
Daily Top 2Weekly Top 5

अमरावतीच्या आयएएस सुपूत्राचा लंडनमध्ये डंका; जबलपूर महापालिकेच्या कारभाराचे कौतुक

By गणेश वासनिक | Updated: September 13, 2023 18:33 IST

देशभरातून एकमात्र जबलपूर महानगरपालिकेची निवड झाली होती, हे विशेष. 

अमरावती: अमरावती येथील आयएएस सुपूत्र असलेल्या स्वप्नील वानखडे यांनी जबलपूर महापालिकेच्या आयुक्तपदी कार्यरत असताना राबविलेल्या विविध उपक्रमांची थेट ‘लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स’ ने दखल घेतली आहे. वानखडे यांच्या कार्यकर्तृत्वाचा लंडनमध्ये डंका वाजल्याने अंबानगरीच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे. देशभरातून एकमात्र जबलपूर महानगरपालिकेची निवड झाली होती, हे विशेष. 

जबलपूर शहरातील लहान मुले, महिला आणि वृद्धांना चांगले वातावरण देण्यासाठी प्रशिक्षणानंतर नगरसेवक परतले आहे. स्मार्ट अंगणवाडी, वाचनालय, उत्कृष्ट लसीकरण केंद्र आणि स्मार्ट संस्कारी लंडनपर्यंत बागांची चर्चा झाली. लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समध्ये जबलपूर महापालिकेने संस्कारगृहातील लहान मुले, महिला आणि वृद्धांना अधिक चांगल्या सुविधा देण्याच्या महापालिका आणि स्मार्ट सिटीच्या कार्याचे खूप कौतुक झाले आहे. जबलपूर महापालिकेचे आयुक्त स्वप्नील वानखडे यांच्यासह काही नगरसेवकांचा प्रशिक्षण दौरा नुकताच आटोपला. स्मार्ट सिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. चंद्रप्रताप गोहल, सहाय्यक आयुक्त संभाव अयाची यांनी प्रशिक्षणादरम्यान सविस्तर माहिती दिली. लंडन येथे नुकतेच झालेल्या प्रशिक्षणात देशातील एकमेव जबलपूरला सहभागी होता आले. यादरम्यान, जबलपूरच्या कामगिरीची छायाचित्रे आणि तथ्ये यांच्या माध्यमातून विचार मांडण्यात आले. यात वाचनालय, स्मार्ट अंगणवाडी, लसीकरण केंद्र, बसेसमधील उद्यानांमध्ये लहान मुले, महिला व वृद्धांसाठी केलेली कामे सोयीच्या दृष्टिकोनातून अधिक लक्षणीय ठरली. आई-वडीलांच्या प्रेरणेने यशस्वी वाटचाल सुरू आहे. - स्वप्नील वानखडे, आयुक्त जबलपूर महापालिका जगभरातील टॉप टेनमध्ये जबलपूरभारत, अमेरिका, ब्राझील, मेक्सिको, आयर्लंड ९ देशांतील दहा शहरांनी भाग घेतला.जॉर्डन, पोलंड, ग्रीस, कोसोवा या देशांच्या नावांचा समावेश होता. टॉप १० शहरांमध्ये जबलपूरचे नाव निवडले गेले. केंद्र शासनामार्फत राबविण्यात येत असलेल्या नर्चरिंग अँड नेबरहुड चॅलेंज अंतर्गत जबलपूर स्मार्ट सिटीने शहरातील उद्याने, अंगणवाडी, आरोग्य उपचार केंद्र आदी ठिकाणी अनेक प्रकारची विकासकामे केली आहेत.

टॅग्स :Amravatiअमरावती