लोकमत न्यूज नेटवर्कदिल्ली/अमरावती : स्वच्छ वायू सर्वेक्षण २०२५ मध्ये अमरावती शहराने देशभरातील शहरांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करत पहिले पारितोषिक पटकावले आहे. हा पुरस्कार मंगळवारी (दि.९) नवी दिल्ली येथे झालेल्या सोहळ्यात केंद्रीय पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्री भूपेंद्र यादव यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. अमरावती महापालिकेच्यावतीने आयुक्त सौम्या शर्मा (चांडक) यांनी हा सन्मान स्वीकारला.
केंद्र सरकारच्या पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालयाच्या वतीने राष्ट्रीय स्वच्छ वायू कार्यक्रम (एनसीएपी) २०२५ अंतर्गत घेण्यात आलेल्या या सर्वेक्षणामध्ये अमरावती शहराने द्वितीय श्रेणी (३ ते १० लाख लोकसंख्या) या गटात स्पर्धेत परिपूर्ण २०० गुण मिळवत देशात अव्वल स्थान पटकावले. अमरावतीला ७५ लाखांचे रोख पारितोषिक प्रदान करण्यात आले.
या यशामुळे अमरावतीने अन्य शहरांसाठी एक आदर्श उभारला असून, स्वच्छ वायू आणि हरित जीवनशैलीच्या दिशेने वाटचाल करणाऱ्या शहरांमध्ये अमरावतीचे नाव आता अग्रगण्य राहील यात शंका नाही.
मध्य प्रदेशातील इंदूर व देवास अव्वल
राष्ट्रीय स्वच्छ हवा कार्यक्रमांतर्गत (एनसीएपी) वायूप्रदूषण कमी करून शुद्ध हवेच्या क्रमवारीत इंदूर, देवास व महाराष्ट्रातील अमरावती या शहरांनी अव्वल स्थान पटकावले आहे. मंगळवारी येथे आयोजित एका पुरस्कार सोहळ्यात केंद्रीय पर्यावरण मंत्री भूपेंद्र यादव यांनी ही घोषणा केली. औद्यागिक केंद्रे किंवा कोळसा खाणी असतानादेखील वायूप्रदूषण कमी करण्यात या शहरांनी उल्लेखनीय प्रगती केल्याचे यादव यांनी नमूद केले.
दहा लाखांपेक्षा अधिक लोकसंख्या असणाऱ्या शहरांमध्ये शुद्ध हवेच्या क्रमवारीत इंदूर प्रथम तर जबलपूर दुसन्या स्थानी आहे. उत्तर प्रदेशातील आक्षा व गुजरातमधील सुरत यांचा संयुक्तरीत्या तिसरा क्रमांक लागतो. ३ ते १० लाख लोकसंख्या गटातील शहरांमध्ये शुद्ध हवेच्या क्रमवारीत महाराष्ट्रातील अमरावती शहर अव्वल ठरले आहे. उत्तर प्रदेशातील झांसी व मुरादाबाद शहरांचा संयुक्तरीत्या दुसरा क्रमांक लागतो तर राजस्थानातील अवलर शहर तिसन्या स्थानी आहे. तीन लाखांपेक्षा कमी लोकसंख्येच्या शहरांमध्ये मध्यप्रदेशचे देवास प्रथम क्रमांकावर आहे. यात हिमाचल प्रदेशातील परवाणू दसन्या तर ओडिशातील अंगल शहराचा राज्ज हवेच्या क्रमवारीत तिसरा क्रमांक लागतो.
"स्वच्छ वायू सर्वेक्षण २०२५ मध्ये अमरावतीने देशात पहिले पारितोषिका पटकावणे ही शहरवासीयांसाठी गौरवाची बाब आहे. हे पारितोषिक अधिक प्रेरणा देणारे असून, भविष्यातील पर्यावरणपूरक धोरणे अधिक बळकटपणे राबविण्याचा संकल्प आहे. अमरावतीला देशातील एक हरित आणि स्वच्छ शहर म्हणून ओळख मिळवून देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत."- सौम्या शर्मा (चांडक), आयुक्त