Amravati youth killed in tractor-car collision; Incident on Adsul-Deori road, a serious one | ट्रॅक्टर-कारच्या धडकेत अमरावतीचा युवक ठार; अडसूळ-देवरी रस्त्यावरील घटना, एक गंभीर

ट्रॅक्टर-कारच्या धडकेत अमरावतीचा युवक ठार; अडसूळ-देवरी रस्त्यावरील घटना, एक गंभीर

अमरावती : तेल्हारा (जि. अकोला) तालुक्यातील देवरी-अडसूळ रस्त्यावर उमरीनजीक ट्रॅक्टर व कारच्या धडोत अमरावती येथील युवक ठार झाला. ही घटना २२ जानेवारी रोजी सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास घडली. प्रकाश जांभे (३५, रा. महेंद्र कॉलनी, अमरावती) असे मृताचे नाव आहे.

तेल्हारा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, देवरी-अडसूळ मार्गाने अमरावती येथील कौस्तुभ सुभाष शिंगणे (२५) व प्रकाश जांभे (३५) हे दोघे कार (एमएच २७, बीई ५८१) ने शेगावकडे जात असताना, मार्गावरील उमरीनजीक मातीने भरलेला ट्रॅक्टर क्र. (एमएच३० बीबी १६३६) यास मागून धडक दिली. अपघात एवढा भीषण होता की, ट्रॅक्टरची ट्रॉली उलटली होती. या अपघातात वाहनात बाजूला बसलेला प्रकाश जांभे (३५) याचा घटनास्थळीच मृत्यू झाला, तर कौस्तुभ हा जखमी झाला. तेल्हारा पोलिसांत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. 

Web Title: Amravati youth killed in tractor-car collision; Incident on Adsul-Deori road, a serious one

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.