शहरं
Join us  
Trending Stories
1
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
2
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
3
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
4
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
5
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
6
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
7
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
8
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
9
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
10
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
11
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
12
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
13
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
14
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
15
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
16
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
17
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
18
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
19
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
20
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

अमरावती : वर्षा लढ्ढा महापालिका आयुक्त, तर सत्यम गांधी जिल्हा परिषदेचे नवे सीईओ

By प्रदीप भाकरे | Updated: April 2, 2026 21:35 IST

अमरावती महानगरपालिकेच्या आयुक्त सौम्या शर्मा-चांडक या प्रसूती रजेवर जात असल्याने त्यांच्या रिक्त जागी वर्षा लढ्ढा यांची वर्णी लागली आहे.

​अमरावती: राज्य शासनाने गुरुवारी भारतीय प्रशासन सेवेतील अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश निर्गमित केले असून, यात अमरावती जिल्ह्याला दोन नवीन वरिष्ठ अधिकारी मिळाले आहेत. वर्षा लढ्ढा यांची अमरावती महानगरपालिकेच्या आयुक्तपदी, तर सत्यम गांधी यांची अमरावती जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

अमरावती महानगरपालिकेच्या आयुक्त सौम्या शर्मा-चांडक या प्रसूती रजेवर जात असल्याने त्यांच्या रिक्त जागी वर्षा लढ्ढा यांची वर्णी लागली आहे. लढ्ढा या सध्या पुणे येथील महाराष्ट्र कृषी संशोधन व शैक्षणिक परिषदेत सदस्य सचिव म्हणून कार्यरत होत्या. त्या महाराष्ट्र प्रशासन सेवेतील अनुभवी अधिकारी असून, त्यांना नुकतेच आयएएस केडरचे नामांकन मिळाले आहे.​सत्यम गांधी अमरावती जिल्हा परिषदेचे नवे ‘बॉस’

​अमरावती जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदाची धुरा आता सत्यम गांधी सांभाळणार आहेत. गांधी हे २०२० च्या बॅचचे आयएएस अधिकारी असून, यापूर्वी ते सांगली-मिरज-कुपवाड महानगरपालिकेचे आयुक्त म्हणून कार्यरत होते. त्यांच्या शिस्तबद्ध आणि कार्यक्षम कार्यशैलीची प्रशासकीय वर्तुळात चर्चा असते.​संजिता महापात्र यांची बदली

​जिल्हा परिषदेच्या मावळत्या मुख्य कार्यकारी अधिकारी संजिता महापात्र यांची बदली आता सांगली-मिरज-कुपवाड महापालिकेच्या आयुक्तपदी करण्यात आली आहे. म्हणजेच सत्यम गांधी आणि संजिता महापात्र यांच्यामध्ये पदांची एकप्रकारे अदलाबदल झाली आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Amravati gets new municipal commissioner and Zilla Parishad CEO.

Web Summary : Varsha Laddha is Amravati's new municipal commissioner, replacing Saumya Sharma-Chandak. Satyam Gandhi becomes Zilla Parishad CEO, succeeding Sanjita Mahapatra, who transfers to Sangli-Miraj-Kupwad. Gandhi previously served as commissioner there.