अमरावती : वर्षा लढ्ढा महापालिका आयुक्त, तर सत्यम गांधी जिल्हा परिषदेचे नवे सीईओ

By प्रदीप भाकरे | Updated: April 2, 2026 21:35 IST2026-04-02T21:34:27+5:302026-04-02T21:35:18+5:30

अमरावती महानगरपालिकेच्या आयुक्त सौम्या शर्मा-चांडक या प्रसूती रजेवर जात असल्याने त्यांच्या रिक्त जागी वर्षा लढ्ढा यांची वर्णी लागली आहे.

Amravati: Varsha Laddha is the new Municipal Commissioner, while Satyam Gandhi is the new CEO of Zilla Parishad. | अमरावती : वर्षा लढ्ढा महापालिका आयुक्त, तर सत्यम गांधी जिल्हा परिषदेचे नवे सीईओ

अमरावती : वर्षा लढ्ढा महापालिका आयुक्त, तर सत्यम गांधी जिल्हा परिषदेचे नवे सीईओ

​अमरावती: राज्य शासनाने गुरुवारी भारतीय प्रशासन सेवेतील अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश निर्गमित केले असून, यात अमरावती जिल्ह्याला दोन नवीन वरिष्ठ अधिकारी मिळाले आहेत. वर्षा लढ्ढा यांची अमरावती महानगरपालिकेच्या आयुक्तपदी, तर सत्यम गांधी यांची अमरावती जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

अमरावती महानगरपालिकेच्या आयुक्त सौम्या शर्मा-चांडक या प्रसूती रजेवर जात असल्याने त्यांच्या रिक्त जागी वर्षा लढ्ढा यांची वर्णी लागली आहे. लढ्ढा या सध्या पुणे येथील महाराष्ट्र कृषी संशोधन व शैक्षणिक परिषदेत सदस्य सचिव म्हणून कार्यरत होत्या. त्या महाराष्ट्र प्रशासन सेवेतील अनुभवी अधिकारी असून, त्यांना नुकतेच आयएएस केडरचे नामांकन मिळाले आहे.

सत्यम गांधी अमरावती जिल्हा परिषदेचे नवे ‘बॉस’

​अमरावती जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदाची धुरा आता सत्यम गांधी सांभाळणार आहेत. गांधी हे २०२० च्या बॅचचे आयएएस अधिकारी असून, यापूर्वी ते सांगली-मिरज-कुपवाड महानगरपालिकेचे आयुक्त म्हणून कार्यरत होते. त्यांच्या शिस्तबद्ध आणि कार्यक्षम कार्यशैलीची प्रशासकीय वर्तुळात चर्चा असते.

​संजिता महापात्र यांची बदली

​जिल्हा परिषदेच्या मावळत्या मुख्य कार्यकारी अधिकारी संजिता महापात्र यांची बदली आता सांगली-मिरज-कुपवाड महापालिकेच्या आयुक्तपदी करण्यात आली आहे. म्हणजेच सत्यम गांधी आणि संजिता महापात्र यांच्यामध्ये पदांची एकप्रकारे अदलाबदल झाली आहे.

Web Title : अमरावती को मिले नए नगर आयुक्त और जिला परिषद सीईओ।

Web Summary : वर्षा लड्ढा अमरावती की नई नगर आयुक्त बनीं, सौम्या शर्मा-चांडक की जगह लेंगी। सत्यम गांधी जिला परिषद के सीईओ बने, संजीता महापात्र का स्थान लेंगे, जिनका तबादला सांगली-मिराज-कुपवाड हो गया। गांधी पहले वहां आयुक्त थे।

Web Title : Amravati gets new municipal commissioner and Zilla Parishad CEO.

Web Summary : Varsha Laddha is Amravati's new municipal commissioner, replacing Saumya Sharma-Chandak. Satyam Gandhi becomes Zilla Parishad CEO, succeeding Sanjita Mahapatra, who transfers to Sangli-Miraj-Kupwad. Gandhi previously served as commissioner there.