शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Hamas War Ceasefire Update: हमासला युद्धविरामाच्या सर्व अटी मान्य, आता इस्रायलच्या भूमिकेकडे लक्ष; गाझावासीयांना दिलासा मिळणार?
2
सूर्यकुमार यादवचे वादळी शतक! तिलकच्या साथीने SRH ला झोडले, MI ला संकटातून बाहेर काढून विजयी केले 
3
"माझा 100 दिवसांचा आराखडा तयार, निकाल लागल्यानंतर..."; पंतप्रधान मोदींचा 'इरादा पक्का'
4
दारूड्या कारचालकाचा कहर! चक्क पोलीस निरीक्षकाच्या कारलाच दिली जोरदार धडक
5
KKR चे चार्टर्ड विमान अचानक कोलकाताऐवजी गुवाहाटीकडे वळवावे लागले; वाचा नेमके काय घडले
6
गाझातील युद्धविरामाची चर्चा अनिर्णित, भडकलेल्या इस्रायलचे राफावर एयर स्ट्राइक
7
भारतीय वंशाच्या सुनीता विल्यम्स इतिहास रचणार, 12 वर्षांनंतर तिसऱ्यांदा अंतराळात जाणार...
8
राहुल गांधींनी काँग्रेस कार्यकर्त्यांकडं काय मागितलं? निवडणुकीच्या धामधुमीत लिहिलं भावनिक पत्र!
9
ठाणे लोकसभा मतदारसंघासाठी 24 उमेदवार रिंगणात; चिन्हे झाली जाहीर, पाहा कुणाला काय?
10
सभांमध्ये वेगळेच विषय गाजले, पण 'वहिनीं'च्या कार्यकर्त्यांनी गावचे मुद्दे मांडले; प्रचारतंत्र 'पवारफुल्ल' ठरेल?
11
नवी मुंबईत यापुढे सबकुछ गणेश नाईक! फडणवीसांच्या आश्वासनावरच शांत झाले भाजपा कार्यकर्ते
12
मुंबई विद्यापीठाचा बी. कॉम सत्र ६ चा निकाल जाहीर; परीक्षेत १६,६३६ विद्यार्थी उत्तीर्ण
13
आव्हान संपल्यावर मुंबई इंडियन्सला सूर गवसला; T20 वर्ल्ड कपपूर्वी हार्दिक पांड्याही फॉर्मात आला
14
काँग्रेसच्या विजय वडेट्टीवारांविरोधात भाजपाची मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार; 'त्या' विधानावरून भाजपा आक्रमक
15
नवी मुंबई आंतराष्ट्रीय विमानतळावर दिबांच्याच नावाची घोषणा होणार- देवेंद्र फडणवीस
16
CM अरविंद केजरीवालांचा पाय आणखी खोलात; नायब राज्यपालांनी केली NIA चौकशीची मागणी
17
'काँग्रेस तुमचे पैसे वाटेल...' मल्लिकार्जुन खरगेंचे अपूर्ण विधान खोट्या दाव्यासह व्हायरल
18
भारतीय संघाच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या जर्सीचं हटके लॉचिंग! Video Viral 
19
माढ्यात धैर्यशील मोहिते पाटलांची ताकद वाढली! भालके गटाचा पाठिंबा जाहीर; समीकरणे बदलणार?
20
"भाजपा खूप दिवसांपासून दिवास्वप्न पाहतेय..."; नवीन पटनायक यांचा पंतप्रधान मोदींवर पलटवार

अमरावती विद्यापीठाच्या पहिल्याच ‘डी. लिट’ला ग्रहण, मीनल ठाकरे यांची कुलपतींंकडे तक्रार

By ऑनलाइन लोकमत | Published: February 20, 2018 5:34 PM

अमरावती : संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाने प्राचार्य भूजंग उर्फ संतोष ठाकरे यांना महानुभाव दर्शनासाठी ‘डी.लिट’ देण्याचा निर्णय घेतला असून, ही सर्वोच्च पदवी गैरकायदेशीर बाबीचा वापर करून त्यांनी मिळविली आहे. परिणामी शुक्रवार, २३ फेब्रुवारी रोजी होणा-या दीक्षांत समारंभात ही ‘डी.लिट’ ठाकरेंना प्रदान करू नये, अशी तक्रार विद्यापीठाच्या अधिसभा सदस्य मीनल ठाकरे ...

अमरावती : संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाने प्राचार्य भूजंग उर्फ संतोष ठाकरे यांना महानुभाव दर्शनासाठी ‘डी.लिट’ देण्याचा निर्णय घेतला असून, ही सर्वोच्च पदवी गैरकायदेशीर बाबीचा वापर करून त्यांनी मिळविली आहे. परिणामी शुक्रवार, २३ फेब्रुवारी रोजी होणा-या दीक्षांत समारंभात ही ‘डी.लिट’ ठाकरेंना प्रदान करू नये, अशी तक्रार विद्यापीठाच्या अधिसभा सदस्य मीनल ठाकरे (भोंडे) यांनी कुलपतींकडे केली आहे.विद्यापीठाचे कुलपती तथा राज्यपाल सी. विद्यासागर राव यांच्याकडे मीनल ठाकरे यांनी १८ फेब्रुवारी रोजी यासंदर्भात तक्रार पाठविली आहे. विशेषत: यातक्रारीत तत्कालीन कुलगुरुंनी ‘डी.लिट’बाबत व्यवस्थित प्रक्रिया हाताळली नसल्याचा आक्षेप घेण्यात आला आहे. त्यावेळी नोंदविलेल्या तक्रारीची दखल घेण्यात आलेली नाही. अतिशय तडकाफडकी ‘डी.लिट’ देण्यासंदर्भात निर्णय घेण्यात आला. पदवीसाठी जे संशोधन करण्यात आले ते संशयास्पद असून याबाबतची संपूर्ण प्रक्रिया सदोष असल्याचा संशय मीनल ठाकरे यांनी व्यक्त केला आहे. यापूर्वी संतोष ठाकरे यांच्याविरुद्ध स्वत:च्या भावाच्या पत्नीच्या गुणवाढ आरोपावरून त्यांना विद्यापीठातून बडतर्फ करण्यात आले होते, असे मीनल ठाकरे यांनी तक्रारीत म्हटले आहे. महात्मा फुले महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी त्यांच्या विरोधात सामूहिक तक्रार नोंदविली होती, हे विशेष. संतोष ठाकरे यांना प्राचार्य पदाहून बडतर्फ करण्यात आले करण्यात आले होते. अशी सर्व प्रकरणे आणि आपल्या पदाचा वेळोवेळी गैरवापर करणारी व्यक्ती प्रचंड दशहत आणि शिताफीने आपल्या गैरकायदेशीर बाबी कायदेशीर करून घेत असताना अशा व्यक्तिला विद्यापीठातील सर्वोच्च पदवी बहाल केली जात असेल तर ही बाब खेदजनक आहे. त्यामुळे याप्रकरणी सखोल चौकशी करावी, चौकशी होईस्तोवर ‘डी.लिट’ प्रदान करू नये, अशी मागणी मीनल ठाकरे यांनी कुलपतींकडे केली आहे. यासंदर्भात तक्रारीची प्रत विद्यापीठ अनुदान आयोगाचे अध्यक्ष, राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री, अमरावती विद्यापीठाचे कुलगुरु यांच्याकडेदेखील पाठविण्यात आली आहे.

मीनल ठाकरे यांनी माहितीच्या अधिकारातून संतोष ठाकरे यांच्या ‘डी.लिट’ संदर्भात कागदपत्रे मागितली असून ती त्यांना दिले जातील. मात्र, संतोष ठाकरे यांना ‘डी.लिट.’ देण्यासंदर्भात ८ महिन्यांपूर्वीच अधिसूचना निर्गमित झाली आहे. ही पदवी नियमानुसार दिली जात असून दीक्षांत समारंभात त्यांना प्रदान केली जाईल.- मुरलीधर चांदेकर,कुलगुरू, संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ

मी खुश आहे. ज्या वर्तमानपत्राने मला ‘डी.लिट’ दिली जाते, हे वृत्त प्रकाशित केले आहे, तक्रार राज्यपालांकडे आहे. या तक्र ारीवर विद्यापीठ प्रशासन योग्य ते सोपस्कार करतील आणि त्यांनी करावेतही. - संतोष ठाकरे,प्राचार्य, गाडगे महाराज महाविद्यालय, मूर्तिजापूर

टॅग्स :Amravatiअमरावती