Amravati विद्यापीठ सिनेट निवडणूक कार्यक्रम जाहीर, २० नोव्हेंबरला मतदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 18, 2022 13:03 IST2022-10-18T13:01:24+5:302022-10-18T13:03:17+5:30
अधिसूचना जारी, नामांकन अर्ज भरण्याचा अवधी २७ ऑक्टोबर, ४ नोव्हेंबर रोजी नामांकन अर्जाची माघार

Amravati विद्यापीठ सिनेट निवडणूक कार्यक्रम जाहीर, २० नोव्हेंबरला मतदान
अमरावती : संत गाडगेबाबा अमरावतीविद्यापीठाचा सिनेट निवडणूक कार्यक्रम सोमवारी जाहीर करण्यात आला. २० नोव्हेंबर २०२२ रोजी मतदान होणार असून, २७ ऑक्टोबरपर्यंत नामांकन अर्ज सादर करता येणार आहे. तर उमेदवारांना ४ नाेव्हेंबर राेजी नामांकन मागे घेता येणार आहे. त्यामुळे येत्या काही दिवसात सिनेट निवडणुकीच्या अनुषंगाने पाचही जिल्ह्यात धूम असणार आहे.
सिनेट निवडणुकीसाठी पात्र असलेल्या उमेदवारांना नामांकन अर्जासाठी पाचशे रुपये शुल्क आकारले जाणार आहे. तर २७ ऑक्टोबरपर्यंत नामांकन अर्ज सादर करता येणार आहे. २८ ऑक्टोबर रोजी नामांकन अर्जाची छाननी केली जाईल. नामांकन अर्जाबाबत दाखल आक्षेप, हरकती संदर्भात १ नोव्हेंबर रोजी कुलगुरू, कुलसचिवांसमक्ष सुनावणी होणार आहे. तर ४ नोव्हेंबर रोजी उमेदवारांची अंतिम यादी प्रकाशित केली जाणार आहे. तर २० नोव्हेंबर रोजी सकाळी ७ ते सायंकाळी ५ वाजता मतदान प्रक्रिया राबविली जाईल. ४४ सिनेट सदस्य निवडणुकीत एससी, एसटी, डीटी/ एनटी, ओबीसी संवर्गासह महिला, जनरल असे आरक्षण असणार आहे.
असे निवडले जातील सिनेट सदस्य
महाविद्यालयीन प्राचार्य : १०
संस्था चालक प्रतिनिधी : ६
संचालक प्रतिनिधी : १०
विद्यापीठ शिक्षक : ३
पदवीधर नोंदणी : १०
विद्वत परिषद : २
परीक्षा मंडळ : ३