शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्राच्या लुटारुंना लोकसभा निवडणुकीत जागा दाखवू; उद्धव ठाकरेंचा घणाघात
2
‘आधी बूथ कॅप्चर व्हायचं, आता उमेदवारच पळवले जाताहेत’, इंदूरमधील घटनेवरून काँग्रेसची संतप्त प्रतिक्रिया
3
Delhi DPS Bomb Threat : दिल्लीतील शाळेला ईमेलद्वारे बॉम्बची धमकी, पोलीस घटनास्थळी दाखल
4
काहीही किंमत द्यायला लागली तरी चालेल, पण...; शरद पवारांचा भाजपाला इशारा
5
आरक्षण, घटनेवर खोटा प्रचार सुरू; ४०० हून अधिक जागा जिंकणार : गृहमंत्री शाह
6
Success Story : स्कूल ड्रॉपआऊट, जे बनले देशातील सर्वात श्रीमंत ज्वेलर; देश-विदेशात पसरलाय व्यवसाय
7
भाजप राज्यघटना फाडूनच फेकेल; घटनेची प्रत हाती धरून राहुल गांधी यांचा दावा
8
निवडणुकीच्या रणधुमाळीत एलपीजी सिलेंडर पुन्हा स्वस्त, किमतीमध्ये एवढी झाली घट
9
आजचे राशीभविष्य - १ मे २०२४; आर्थिक लाभ संभवतात अन् नशिबाची साथ लाभेल
10
अरविंद केजरीवालांना ठीक निवडणुकीपूर्वी का अटक केले? सुप्रीम कोर्टाचा ED ला थेट सवाल...
11
मुख्यमंत्री महिलांच्या कपड्यांकडेच बघत असतात, कारण काय? माजी मुख्यमंत्री राबडीदेवी यांचा नितीश कुमारांवर पलटवार
12
वैद्यकीय तज्ज्ञांकडून दिलासा! 'कोविशिल्ड' घेतलेल्यांनी चिंता करू नये; टीटीएस आजार होणे ही दुर्मीळ घटना
13
भाजपचा नवा गेमप्लान, टप्प्यानुसार वेगळे मुद्दे ! कमी मतदानानंतर चिंता वाढली; प्रचाराची नव्याने आखणी
14
वर्षा गायकवाड यांच्या रॅलीला उद्धवसेनेचे पाठबळ, नसीम खान, भाई जगताप नाराज?
15
महाविकास आघाडीचे मुंबईत 'मराठी कार्ड' सर्व सहाही उमेदवार मराठी; महायुतीकडून चार मराठी
16
भयंकर : प्रसूतीवेळी वीज गेली, टॉर्चच्या प्रकाशात सिझर; बाळासह आईचा मृत्यू
17
लखपतीचे झाले करोडपती पण, उमेदवाराकडे "ना बंगला, ना गाडी"
18
वैशाली दरेकर यांच्या मालमत्तेत २३ लाखांची वाढ; कर्ज नाही, स्वतःचे वाहन नाही
19
लालूंच्या कन्येकडे १५.८२ कोटींची संपत्ती; कोणतेही कर्ज नाही
20
किळस अन् कलंक; विद्यमान खासदाराचे वासनाकांड चव्हाट्यावर आल्याने देश नखशिखांत हादरला

अमरावती विद्यापीठाच्या परीक्षा एप्रिलपर्यंत स्थगित 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 01, 2020 7:45 PM

 उन्हाळी परीक्षांचे कॅलेंडर बदलणार : ‘लॉकडाऊन’, संचारबंदीचा परिणाम 

अमरावती : कोविड-१९ विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी १४ एप्रिलपर्यंत ‘लॉकडाऊन’, संचारबंदी लागू करण्यात आली आहे. परिणामी संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या उन्हाळी २०२० परीक्षा एप्रिलपर्यंत स्थगित करण्यात आल्या आहेत. त्याअनुषंगाने विद्यापीठाचे परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक हेमंत देशमुख यांनी १ एप्रिल रोजी परीक्षा स्थगित करण्याबाबत परिपत्रक निर्गमित केले आहे.

अमरावती विद्यापीठाच्या उन्हाळी २०२० परीक्षा १५ एप्रिलपासून सुरू होणार होत्या. त्यानुसार प्रशासनाने परीक्षांचे वेळापत्रक तयार केले. मात्र, १४ एप्रिलपर्यंत ‘लॉकडाऊन’ असल्यामुळे आपसुकच परीक्षांचे कॅलेंडर बदलणार आहे. परिणामी एप्रिलपर्यंत लेखी व प्रात्यक्षिक परीक्षांना स्थगिती देण्याचा निर्णय घेतला आहे. अमरावती विद्यापीठ अंतर्गत ३९४ महाविद्यालयांसाठी परीक्षा स्थगितीबाबतचे आदेश लागू करण्यात आले आहे. तसेच ‘लॉकडाऊन’मुळे अमरावती विद्यापीठ अंतर्गत सर्वच महाविद्यालये बंद ठेवण्याचा निर्णय अगोदरच कुलगुरू मुरलीधर चांदेकर यांनी घेतला आहे. १४ एप्रिलनंतर राज्य शासनाच्या निर्देशानुसार व तत्कालीन परिस्थितीनुरूप परीक्षासंदर्भात निर्णय घेण्यात येणार आहे. अमरावती विद्यापीठाच्या बी.एस्सी., अभियांत्रिकी शाखेच्या परीक्षा १५ एप्रिलपासून प्रारंभ होणार होत्या. मात्र, नव्या आदेशामुळे परीक्षांचे कॅलेंडर बदलणार, हे जवळपास निश्चित झाले आहे. 

उन्हाळी सत्राच्या ६२५ परीक्षाअमरावती विद्यापीठाला उन्हाळी २०२० परीक्षेत ६२५ परीक्षांचे नियोजन करावे लागणार आहे. एप्रिलपर्यंत परीक्षा स्थगित केल्या असल्या तरी मे महिन्यात परीक्षा घ्यावा लागणार आहे. यात मानव्यविद्या शाखा, वाणिज्य व व्यवस्थापन विद्याशाखा, विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखा, आंतरविद्या शाखीय अभ्यास विद्याशाखा या चार शाखांचा समावेश आहे. तर, ३.२५ लाख विद्यार्थी सेमिस्टर पॅटर्न परीक्षेला सामोरे जाणार आहे.

१५ एप्रिलपासून उन्हाळी परीक्षांचे नियोजन करण्यात आले होते. परीक्षांचे वेळापत्रकसुद्धा जाहीर करण्यात आले आहे. मात्र, कोरोना विषाणुमुळे ‘लॉकडाऊन’ असल्याने परीक्षा एप्रिलपर्यंत स्थगित करण्यात येत आहे. विद्यार्थ्यांनी घरीच अभ्यास करावा. यू-ट्युब, आॅनलाईन अभ्यासक्रमाचा लाभ घ्यावा.   - हेमंत देशमुख, संचालक, परीक्षा व मूल्यमापन मंडळ, अमरावती विद्यापीठ

टॅग्स :Amravatiअमरावतीexamपरीक्षा