अमरावती शिक्षक मतदारसंघ; २४ व्या फेरीअखेर सरनाईक आघाडीवर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 4, 2020 21:00 IST2020-12-04T20:59:34+5:302020-12-04T21:00:24+5:30
Amravati News election अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत दुसऱ्या पसंतीच्या २४ व्या फेरीअखेर अपक्ष उमेदवार किरण सरनाइक हे ९९७२ मतांसह आघाडीवर आहेत. सरनाईक यांची आघाडी २४ व्या फेरीपर्यंत कायम आहे.

अमरावती शिक्षक मतदारसंघ; २४ व्या फेरीअखेर सरनाईक आघाडीवर
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती - अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत दुसऱ्या पसंतीच्या २४ व्या फेरीअखेर अपक्ष उमेदवार किरण सरनाइक हे ९९७२ मतांसह आघाडीवर आहेत. सरनाईक यांची आघाडी २४ व्या फेरीपर्यंत कायम आहे.
मावळते आमदार तथा महाआघाडीचे उमेदवार श्रीकांत देशपांडे यांना ७७९३ मते प्राप्त झाली असून, ते दुसऱ्या स्थानी आहेत. अपक्ष उमेदवार शेखर भोयर हे महाआघाडीच्या उमेदवाराला कडवी झुंज देत आहेत. ७६२२ मतांसह ते तिसऱ्या स्थानी आहेत. भोयर यांना देशपांडे यांच्यापेक्षा केवळ १७१ मते कमी असल्याने ते दुसऱ्या स्थानावर पोहोचतात की कसे, याबाबत उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.
सूत्रांनुसार, एकूण २७ उमेदवारांचा समावेश असलेल्या या निवडणुकीत दुसऱ्या पसंतिक्रमासाठी मतगणनेच्या एकूण २६ फेऱ्या पार पडतील. निवडणूक निकालाची स्थिती पालटण्याचे सामर्थ्य असलेल्या यापुढील दोन्ही फेऱ्या निर्णायक आहेत. या फेऱ्यांमधील मते तुलनेने अधिक असल्यामुळे शिगेला पोहोचलेली उत्सुकता शमविण्यासाठी प्रतीक्षा करावी लागणार आहे.