Amravati: गायीला वाचवण्याच्या प्रयत्नात शिवशाही उलटली, दोन ठार, २८ जखमी
By प्रदीप भाकरे | Updated: August 25, 2024 15:47 IST2024-08-25T15:46:35+5:302024-08-25T15:47:09+5:30
Amravati News: गायीला वाचविण्याच्या प्रयत्नात नागपूरहून अकोल्याकडे जाणाऱ्या शिवशाही बस रस्त्याखाली जाऊन उलटली. २५ ऑगस्ट रोजी सकाळी ९ वाजताच्या दरम्यान राष्ट्रीय महामार्ग क्र. सहावरील पेट्रोलपंपासमोर हा अपघात घडला. या अपघातात दोन जण ठार झाले. तर २८ प्रवासी जखमी झाले आहेत.

Amravati: गायीला वाचवण्याच्या प्रयत्नात शिवशाही उलटली, दोन ठार, २८ जखमी
- प्रदीप भाकरे
अमरावती - गायीला वाचविण्याच्या प्रयत्नात नागपूरहून अकोल्याकडे जाणाऱ्या शिवशाही बस रस्त्याखाली जाऊन उलटली. २५ ऑगस्ट रोजी सकाळी ९ वाजताच्या दरम्यान राष्ट्रीय महामार्ग क्र. सहावरील पेट्रोलपंपासमोर हा अपघात घडला. या अपघातात दोन जण ठार झाले. तर २८ प्रवासी जखमी झाले आहेत. घटनेनंतर महामार्गावर काही तास वाहतूक विस्कळीत झाली होती. नांदगाव पेठ पोलिसांनी शर्थीचे प्रयत्न करून बसमधील प्रवाशांचे प्राण वाचवले.
एम.एच.०९ इ.एम १७७८ ही नागपूर अकोला शिवशाही बस नागपूरहून अमरावती येत असतांना सावर्डीनजीकच्या पेट्रोल पंपासमोरील दुभाजकावरून अचानक गायीने उडी मारली. तिला वाचवण्याच्या प्रयत्नात चालकाचे वाहनांवरून नियंत्रण सुटले आणि शिवशाही बस उलटली. यामध्ये एकुण ३५ प्रवासी होते. त्यापैकी दोन जण जागीच ठार झाले. पंचफुला रामकृष्ण इंगळे (७५, रा.राजुरा, चांदूरबाजार) व आदित्य लीलाधर इंगळे (२३, रा.नागपूर) अशी मृतांची संख्या आहे. तर जखमींमध्ये रामराव आप्पा सावंत (६५, रा.तिवसा), मीरा माणिकराव कडूकर (रा.अचलपूर), माणिक मारोतराव कडुकार (६५, बेगमपुरा अचलपूर), सिद्धार्थ रामकृष्ण कांबळे (५६, राजुरा, चांदूरबाजार), चंद्रकलाबाई श्रावणाजी चौरे (खोलापूरी गेट, अमरावती), सिंधू भारत लांडगे (४६, रा. तिवसा), विना संतोष बनसोड (४८) व अनिकेत संतोष बनसोड (२२, दोेघेही रा. शिवनगर नागपूर), प्रतिभा कांबळे, माणिक मारोतराव कडूकर (६५, अचलपूर), शैला शैलेंद्र मेश्राम (६०, रा. परतवाडा), कृष्णा दिनेश पटेल (२१, रा.तिवसा), चालक दिनेश प्रल्हादराव विरघट (४५, रा. कौलखेड अकोला), वाहक राधेश्याम प्रकाश साबळे (३१, कानशिवनी अकोला), आशा विनोद खडसे (३८), आशा श्रीधर मेश्राम (६०, नागपूर), प्रतिभा सांगळे आदींचा समावेश आहे. यामध्ये एक तरुणी चक्क बसखाली दबली होती. आयआरबीला पाचारण करून सुद्धा क्रेनची व्यवस्था झाली नाही. त्यामुळे माजी जि.प. सदस्य विनोद डांगे यांनी त्यांच्याकडील जेसीबी तातडीने घटनास्थळी आणले. बस वर उचलून त्या युवतीचे प्राण वाचविले. घटनास्थळी तासभर वाहतूक विस्कळीत झाली होती.