अमरावती : कायदा, सुव्यवस्थेचा आढावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2019 06:00 IST2019-09-26T06:00:00+5:302019-09-26T06:00:57+5:30
सहायक पोलीस आयुक्त, महापालिकेचे सहायक आयुक्त, आयुक्तालयाच्या हद्दीत समाविष्ट अमरावती विधानसभा क्षेत्रातील ठाणेदार उपस्थित होते. विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने अमरावती मतदारसंगात सात भरारी पथकांचे गठण करण्यात आले आहे. यामध्ये एक एपीआय व तीन पोलीस शिपाई यांचा समावेश आहे.

अमरावती : कायदा, सुव्यवस्थेचा आढावा
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : विधानसभा मतदारसंघात आदर्श आचारसंहितेचे काटेकोर पालन व्हावे, यासाठी निवडणूक अधिकारी उदयसिंह राजपूत यांच्या अध्यक्षतेखाली कायदा व सुव्यवस्थेसंदर्भात अधिकाऱ्यांची बुधवारी बैठक घेण्यात आली.
सहायक पोलीस आयुक्त, महापालिकेचे सहायक आयुक्त, आयुक्तालयाच्या हद्दीत समाविष्ट अमरावती विधानसभा क्षेत्रातील ठाणेदार उपस्थित होते. विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने अमरावती मतदारसंगात सात भरारी पथकांचे गठण करण्यात आले आहे. यामध्ये एक एपीआय व तीन पोलीस शिपाई यांचा समावेश आहे. याव्यतिरिक्त तीन एसएसटी पथक, तीन व्हीएसटी पथक व एक व्हीव्हीटी पथक यांचे गठण करण्यात आले आहे.
मतदारसंघात १,७७,१८९ पुरुष, १,६८,०४० स्त्री व १३ इतर असे एकूण ३,४५,२४२ मतदार आहेत. ३०९ मतदान केंद्रे आहेत. मतदारसंघात ६३२ दिव्यांग मतदार आहेत. या मतदान केंद्रांवर सर्व सुविधांची निर्मिती करण्याचे आदेश आरओ राजपूत यांनी यापूर्वीच दिले. निवडणुकीसाठी किमान १४०० मनुष्यबळ लागणार आहेत. २५०० कर्मचाऱ्यांची डेटा एंट्री याअनुषंगाने झाल्याची माहिती नायब तहसीलदार (निवडणूक) प्रवीण देशमुख यांनी दिली. निवडणुकीसाठी २८ झोनल अधिकाºयांचे एक प्रशिक्षण आटोपले. कर्मचाºयांनाही तीन वेळा प्रशिक्षण देण्यात येणार आहे. आचारसंहिता उल्लंघनावर वॉच ठेवण्यासाठी ‘सी-व्हिजिल’ अॅप सुरू आहे. कठोरा नाका, रहाटगाव, वडाळी या ठिकाणी चेकपोस्ट नाके सुरू करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.