शहरं
Join us  
Trending Stories
1
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
2
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
3
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
4
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
5
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
6
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
7
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
8
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
9
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
10
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
11
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
12
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
13
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
14
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
15
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
16
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
17
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
18
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
19
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
20
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
Daily Top 2Weekly Top 5

Amravati: वडील नाहीत, आई करते घरकाम अन् तो करतो मजुरी, मनपा शाळेत शिकणाऱ्या मंगेशने दहावीत घेतले ८४ टक्के गुण

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 27, 2024 20:28 IST

Amravati SSX Exam Result: सोमवारी दहावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर अनेक विद्यार्थी एक-दुसऱ्याला पेढे भरवून पास झाल्याचा आनंदोत्सव साजरा करतानाचे चित्र शहरात सर्वत्र पहायला मिळत होते. परंतु महापालिका शाळेत शिकणारा मंगेश राजगुरे मात्र आपल्या निकालाचा आनंदोत्सव साजरा करू शकला नाही. घरच्या हालाकीच्या परिस्थितीमुळे निकालाच्या दिवशीहीत्याला मजुरीला जावे लागले.

- उज्वल भालेकर अमरावती - सोमवारी दहावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर अनेक विद्यार्थी एक-दुसऱ्याला पेढे भरवून पास झाल्याचा आनंदोत्सव साजरा करतानाचे चित्र शहरात सर्वत्र पहायला मिळत होते. परंतु महापालिका शाळेत शिकणारा मंगेश राजगुरे मात्र आपल्या निकालाचा आनंदोत्सव साजरा करू शकला नाही. घरच्या हालाकीच्या परिस्थितीमुळे निकालाच्या दिवशीहीत्याला मजुरीला जावे लागले. मंगेशने दहावीच्या परीक्षेमध्ये आपल्या परिस्थितीवर मात करत ८४ टक्के गुण मिळविले असून तो महापालिकेच्या सर्व शाळेतून प्रथम आला आहे. त्याने मिळविलेल्या या यशाचे कौतूक महापालिका शिक्षणाधिकारी प्रकाश मेश्राम यांनी देखील केले आहे.

दहावीचा निकाल हा प्रत्येक विद्यार्थ्यांच्या आयुष्याला कलाटणी देणारा असतो. अशाच प्रकारचा कलाटणी देणारा निकाल हा टारखेडा भाजीबाजार परिसरातील रहिवासी असलेला मंगेश राजगुरे या विद्यार्थ्यांचा लागला आहे. मंगेश हा बुधवारा परिसरातील महापालिका मराठी कन्या शाळेतील विद्यार्थी आहे. मंगेशचे वडील नसून त्यांचे निधन झाले आहे. तर आई ही मोलकरीन म्हणून इतर लोकांच्या घरी काम करते. मंगेशला एक मोठा भाऊ असून तो देखील मजुरीचे काम करतो. हालाकीच्या परिस्थितीमुळे मंगेशचे संपूर्ण कुटुंब हे त्याच्या आत्याच्या घरी राहतात. सोमवारी दहावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर अनेक विद्यार्थी आपल्या निकालाचा आनंदोत्सव साजरे करत असताना मंगेश मात्र रोजच्या भाकरीचा प्रश्न सोडविण्यासाठी कामाला गेला होता. यावेळी शाळेतील शिक्षकांनी त्याला कॉल करून त्याला दहावीमध्ये ८४ टक्के गुण मिळाल्याची माहिती दिली.

कोणत्याही प्रकारचे खासगी क्लासेस न करता घरीच शाळेत शिक्षकांनी शिकवलेल्या अभ्यासावर रोज तीन ते चार तास अभ्यास करून त्याने हे यश संपादन केले आहे. महापालिकेच्या सर्व शाळेतून तो सर्वाधिक गुण घेऊन प्रथम आला आहे. मंगेशला आपले उच्च शिक्षण हे विज्ञान विषयात करायचे आहे. परंतु घरची परिस्थिती लक्षात घेता वाणिज्य शाखेत प्रवेश घेऊ असे त्याने लोकमतशी बोलतांना सांगितले.

टॅग्स :ssc examदहावीAmravatiअमरावतीStudentविद्यार्थी