अमरावती महापालिकेचे काम चालते झोपेत; जन्माऐवजी दिला मृत्यूचा दाखला, मुलाऐवजी मुलीचा दाखला !

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 16, 2025 12:04 IST2025-05-16T12:02:54+5:302025-05-16T12:04:23+5:30

Amravati : मुख्यालयातील जन्म-मृत्यू विभागाचा अजब कारभार; बदलवून दिले प्रमाणपत्र

Amravati Municipal Corporation's work is carried out in sleep; Death certificate issued instead of birth, girl's certificate instead of boy's! | अमरावती महापालिकेचे काम चालते झोपेत; जन्माऐवजी दिला मृत्यूचा दाखला, मुलाऐवजी मुलीचा दाखला !

Amravati Municipal Corporation's work is carried out in sleep; Death certificate issued instead of birth, girl's certificate instead of boy's!

लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती :
महापालिका मुख्यालयातील जन्म-मृत्यू नोंदणी विभागात कार्यरत कंत्राटी कर्मचान्यांच्या अफलातून कारभाराने सामान्य नागरिक त्रस्त झाले
आहेत. 'लक्ष्मी' दर्शनाशिवाय कागद पुढे सरकत नसल्याच्या असंख्य तक्रारी असून विभागप्रमुखांनी याकडे अक्षम्य दुर्लक्ष चालविले आहे. अशातच जन्म दाखल्याऐवजी चक्क मृत्यू प्रमाणपत्र दिल्याची आश्चर्यकारक बाब निदर्शनास आल्यानंतर या विभागाचा कारभार ढासळल्याचे स्पष्ट झाले आहे. संबंधितांना अनेकदा येरझारा मारावयास भाग पाडल्यानंतर गत आठवढ्यात जन्माचा दाखला देण्यात आला आहे.


प्राप्त माहितीनुसार स्थानिक जमील कॉलनी येथील रहिवासी शेख गफूर यांनी अमरावती महानगरपालिका मुख्यालयातील जन्म-मृत्यू नोंदणी विभागाकडे अलताफ हुसैन नामक मुलाचा जन्म दाखला मिळण्यासाठी अर्ज सादर केला होता. यासोबत मुलाचे आधारकार्ड, जन्म तारखेचे डॉक्टरांचे प्रमाणपत्रसुद्धा जोडले होते. मात्र, महापालिका प्रशासनाने अलताफ हुसैन या बाळाचा जन्माऐवजी मृत्यूचा दाखला दिला होता. ही बाब पालकांना काही महिन्यांनंतर लक्षात आली. त्यानंतर ही कैफियत शेख गफूर यांनी जन्म-मृत्यू नोंदणी विभागात मांडली. परंतु महापालिका प्रशासनाने 'चल बुलावा आया है' अशा येरझारा मारण्यास भाग पाडले. काही कागदपत्रांची खानापूर्ती केल्यानंतर १५ एप्रिल २०२५ रोजी जन्मतारखेचा सुधारित दाखला हाती पडला. यावरून महापालिका मुख्यालयातील जन्म-मृत्यू नोंदणी विभागाचा कारभार कसा चालतो, हे स्पष्ट होते. यापूर्वी तक्रारींमुळेच तेथील एका कंत्राटी कर्मचान्याला हटविण्यात आले होते, हे विशेष. 


मुलाऐवजी दिला मुलीचा जन्म दाखला
४ एप्रिल २०२५ रोजी रूझेन मिर्झा ईमरान बेग या नावाने जन्म दाखला देण्यात आला. मात्र या प्रमाणपत्रावर पुरुषाएवेजी स्त्री असा उल्लेख करण्यात आला आहे. हा प्रकारसुद्धा कंत्राटी कर्मचाऱ्यांनी केल्याची बाब समोर आली आहे. त्यामुळे विभागप्रमुखांचे दुर्लक्ष असल्याचे दिसून येते.

Web Title: Amravati Municipal Corporation's work is carried out in sleep; Death certificate issued instead of birth, girl's certificate instead of boy's!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.