लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : मुंबई-अमरावती-मुंबई ही विमानसेवा आता पूर्ववत आठवड्यातून चार दिवस सुरू झाली असली, तरी वेळेत पुन्हा एकदा बदल करण्यात आला आहे. बुधवार, ७ जानेवारी रोजी अमरावतीहून दुपारी १२:०५ वाजता विमान मुंबईकडे झेपावेल. दुपारी ११:४५ वाजता मुंबईहून ते अमरावतीकडे झेपावेल.
ही विमानसेवा दाट धुक्याच्या समस्येमुळे १ ते १५ डिसेंबरदरम्यान बंद ठेवण्यात आली होती. त्यानंतर ती पूर्ववत सुरू करण्यात आली, तरी ती आठवड्यातून दोनच दिवस ठेवण्यात आली आणि वेळेतही बदल करण्यात आला होता.
२ जानेवारीपासून आठवड्यातून चार दिवस विमानोड्डाण सुरू झाले आहे. अलायन्स एअरने गेल्यावर्षी २६ ऑक्टोबरपासून हिवाळी वेळापत्रकानुसार महत्त्वपूर्ण बदल केले. दुपारच्या ऐवजी मुंबई-अमरावती ही विमानसेवा सकाळी ७:०५ ते ८:५० आणि अमरावती-मुंबई ही विमानसेवा सकाळी ९:१५ ते १०:३० या वेळेत सुरू करण्यात आली. सोमवार, बुधवार, शुक्रवार आणि रविवार असे चार दिवस ही सेवा उपलब्ध होती. अमरावती मुंबई विमानसेवेत वारंवार होणारा, करण्यात येत असलेला बदल प्रवाशांसाठी डोकेदुखी ठरू लागला आहे, हे विशेष.
आता असे आहे नवे वेळापत्रक
७ ते ३० जानेवारीपर्यंत विमानसेवेच्या वेळा बदलण्यात आल्या आहेत. ७जानेवारीपासून सकाळी ९:५५ वाजता मुंबईहून विमान उड्डाण घेईल आणि ११:४० वाजता अमरावती पोहोचेल. अमरावतीहून दुपारी १२:०५ वाजता मुंबईकडे झेपावेल. १:५० वाजता मुंबईला पोहोचेल. १ फेब्रुवारीपासून सकाळी ७:०५ वाजता अमरावतीकडे उड्डाण घेईल आणि ८:५० वाजता अमरावतीला पोहोचेल. तसेच सकाळी ९:१५ वाजता मुंबईसाठी उड्डाण घेईल आणि १०:३० वाजता मुंबईला पोहोचेल, अशी माहिती अलायन्स एअरच्या संकेतस्थळावरून देण्यात आली आहे.
"७ जानेवारीपासून विमानसेवा आठवड्यातून सोमवार, बुधवार, शुक्रवार व रविवार असे चार दिवस पुन्हा सुरू होत आहे. नव्या वेळापत्रकानुसार अमरावतीहून मुंबईकडे दुपारी १२ वाजून मिनिटांनी मुंबईकडे झेपावेल. तर मुंबईत १ वाजून ४५ मिनिटांनी पोहोचेल. मुंबईहून अमरावती विमानतळावर ११ वाजून ४५ मिनिटांनी लॅन्डींग होईल. "- राजकुमार पटेल, प्रबंधक अमरावती विमानतळ
Web Summary : The Amravati-Mumbai flight schedule changes again, resuming four days a week from January 7. Flights depart Amravati at 12:05 PM and Mumbai at 11:45 AM. The schedule will adjust again in February.
Web Summary : अमरावती-मुंबई विमान सेवा में फिर बदलाव हुआ है, जो 7 जनवरी से सप्ताह में चार दिन फिर से शुरू होगी। अमरावती से दोपहर 12:05 बजे और मुंबई से सुबह 11:45 बजे उड़ानें प्रस्थान करेंगी। फरवरी में कार्यक्रम फिर बदलेगा।