अमरावती बाजार समिती संचालक मंडळाला मुदतवाढ 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 10, 2020 18:47 IST2020-10-10T18:46:49+5:302020-10-10T18:47:02+5:30

अमरावती बाजार समितीलाच्या संचालक मंडळाचा कार्यकाळ १३ ऑक्टोबर २०२० रोजी संपुष्टात येत आहे.

Amravati Market Committee Board of Directors extended | अमरावती बाजार समिती संचालक मंडळाला मुदतवाढ 

अमरावती बाजार समिती संचालक मंडळाला मुदतवाढ 

अमरावती : कोरोनाचा संसर्ग  वाढत असल्याने निवडणुका घेणे प्रशासनाला शक्य नाही. त्यामुळे येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक मंडळाला सहा महिन्यांची मुदतवाढ देण्यात आली असल्याची माहिती उपसभापती नाना नागमोते यांनी दिली. याविषयी शासनाचे पत्र बाजार समितीला प्राप्त झाल्याचे त्यांनी सांगितले.

अमरावती बाजार समितीलाच्या संचालक मंडळाचा कार्यकाळ १३ ऑक्टोबर २०२० रोजी संपुष्टात येत आहे. त्यामुळे दोन महिन्यापूर्वी सभापती व संचालक मंडळाने जिल्हाधिकाऱ्यांना पत्र देऊन निवडणुका घेण्याची विनंती केली होती. या प्रक्रियेसाठी लागणारा खर्चदेखील धनादेशाद्वारे देण्यात येत असल्याचे पत्र जिल्हाधिकाºयांना देण्यात आले होते. मात्र, जिल्ह्यात कोरोनाग्रस्तांची वाढती संख्या, वाढता संसर्ग लक्षात घेता राज्य शासनाने १० जुलैच्या पत्रान्वये २४ जुलैपासून पुढील सहा महिन्यांसाठी सहकारातील निवडणुका पुढे ढकलल्या होत्या.

आता लॉकडाऊनचा कालावदी ३१ ऑक्टोबरपर्यंत वाढविण्यात आलेला आहे. जिल्ह्यातील कोरोना संसर्गाची एकूण स्थिती पाहता संसर्ग आटोक्यात यायला काही अवदी लागणार आहे. त्यामुळे बाजार समितीची निवडणूक १२ एप्रिल २०२१ पर्यंत पुढे ढकलण्यात आल्याचे नाना नाममोते यांनी सांगितले.

Web Title: Amravati Market Committee Board of Directors extended

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.