अमरावतीतील तरुणी प्रचंड दहशतीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 17, 2019 11:23 PM2019-07-17T23:23:36+5:302019-07-17T23:24:02+5:30

शहर तथा जिल्ह्यातील महिला व तरुणी प्रचंड दहशतीत असून, महिला सुरक्षेविषयी पोलिसांनी ठोस व कठोर पावले उचलायला हवी, असे राष्ट्रवादी युवती महिला काँग्रेसने पत्रपरिषदेतून आवाहन केले. अमरावती पोलीस गुन्हेगारीवर अंकुश बसविण्यात अपयशी ठरल्याचा आरोपही राष्ट्रवादी युवती काँग्रेसने केला आहे.

Amravati girls are in tremendous danger | अमरावतीतील तरुणी प्रचंड दहशतीत

अमरावतीतील तरुणी प्रचंड दहशतीत

Next
ठळक मुद्देपत्रपरिषद : राष्ट्रवादी युवती काँग्रेसचा आरोप,पोलिसांनी उचलावे पावले

लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : शहर तथा जिल्ह्यातील महिला व तरुणी प्रचंड दहशतीत असून, महिला सुरक्षेविषयी पोलिसांनी ठोस व कठोर पावले उचलायला हवी, असे राष्ट्रवादी युवती महिला काँग्रेसने पत्रपरिषदेतून आवाहन केले. अमरावती पोलीस गुन्हेगारीवर अंकुश बसविण्यात अपयशी ठरल्याचा आरोपही राष्ट्रवादी युवती काँग्रेसने केला आहे.
दौऱ्यावर असणाºया राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष सक्षणा सलगर, महिला आयोगाच्या माजी सदस्य आशा मिरगे, संगीता ठाकरे, रूपाली बुले, प्रदेश सचिव कल्पना वानखडे, राई देशमुख, संगीता देशमुख, छाया कडू, स्नेहा जाणे, पूजा कोठे, सरला इंगळे यांनी बुधवारी पत्रपरिषदेतून पोलीस विभागावर ताशेरे ओढले. अमरावतीत भरदिवसा एका तरुणीची चाकूने वार करून निर्घृण हत्या करण्यात आली. यापूर्वीही महिलावरील हल्ले व अत्याचारांच्या घटना शहरात घडल्या आहेत. तरुण विद्यार्थिंनीवर होणाºया या हल्ल्याच्या घटना पोलिसांच्या अकार्यक्षमतेमुळे होत असल्याचा आरोप राष्ट्रवादीने केला आहे. तरुणीवर सतरा चाकूचे वार केले जातात. हा अमानवीय प्रकार पुढे आला आहे. या घटनेमुळे शहरासह जिल्ह्यातील महिला व तरुणी स्वत:ला आता असुरक्षित समजू लागल्या आहेत. या गंभीर विषयाच्या अनुषंगाने सक्षणा यांनी शहरातील एका महाविद्यालयाला भेट दिली, त्यावेळी विद्यार्थिनीने नाव न सांगण्याच्या अटीवर ती प्रचंड दहशतीत व भीतीत असल्याचे सांगितले. त्याचप्रमाणे वरूड येथील एक विद्यार्थिनीदेखील भयभित झाल्याचे त्यांना आढळले. पोलीस महिलांना सुरक्षित वातावरण देण्यात अपयशी ठरले आहे. पोलीस आयुक्त संजय बावीस्कर यांनी महिलांच्या सुरक्षेसाठी कडक पावले उचलण्याची गरज होती. परंतु, त्यांनी काहीच केले नाही. दामिनी पथकदेखील दिसेनासे झाले. राज्यातील गुन्हेगारीत अमरावती शहराची परिस्थितीही आता सर्वाची धोक्याची झाल्याचे राष्ट्रवादीच्या महिला पदाधिकाऱ्यांनी सांगितले.
सक्षणा यांचे डोळे पाणावले
राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष सक्षणा सलगर यांनी राजापेठ हद्दीत घडलेल्या हत्याकांडातील प्रत्यक्षदर्शी तरुणीची भेट घेतली. मैत्रिणीच्या हत्येचा थरारक अनुभव त्या तरुणीने भयभीत अवस्थेत सक्षणा यांना सांगितले. पत्रपरिषदेत बोलताना त्या तरुणीची व्यथा सांगताना सक्षणा यांचे डोळे पाणावले.
विजया रहाटकर यांचे मौन का?
राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांनी महिलांविषयक अनेक चांगले निर्णय घेतले. मात्र, महिलांच्या सुरक्षेविषयीच त्यांनी चुप्पी साधली आहे. भाजप आमदार राम कदमसह अन्य भाजप नेत्यांच्या महिलांविषयक भाष्यावर त्यांनी मौन धरले. महिलांच्या सुरक्षेविषयी कामकाज करताना अपमान केला जातो. याविषयी त्यांनी मौन बाळगल्याचा आरोप महिला आयोगाच्या माजी सदस्य आशा मिरगे यांनी केला आहे.
मुख्यमंत्री धृतराष्ट्र असल्याची टीका
राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस धृतराष्ट्र असल्याची टीका राष्ट्रवादीच्या महिलांनी पत्रपरिषदेतून केली. अमरावती शहरासह राज्यातील कायदा व सुव्यवस्थेकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे दुर्लक्ष आहे. गृहखाते त्यांनी आता सोडले पाहिजे, असे त्या म्हणाल्या. महिलांच्या सुरक्षेला सरकार व पोलीस प्राधान्य देत नाही. आघाडी सरकारच्या कार्यकाळापेक्षा गेल्या पाच वर्षांत राज्यात गुन्ह्यांच्या प्रमाणात मोठी वाढ झाल्याचे त्यांनी सांगितले.

Web Title: Amravati girls are in tremendous danger

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.