अमरावती- १५ वर्षांनंतर आढळला फॉस्टर्नचा मांजऱ्या साप

By ऑनलाइन लोकमत | Published: June 16, 2018 03:04 PM2018-06-16T15:04:26+5:302018-06-16T15:04:26+5:30

अतिदुर्मीळ जिवांच्या गटात मोडणारा आणि मेळघाटच्या जंगलात पाच वर्षांपूर्वी नोंद करण्यात आलेल्या फॉस्टर्नचा मांजºया साप चक्क बडनेरा येथील बस आगारात आढळला.

Amravati- Fostera's cat snake found after 15 years | अमरावती- १५ वर्षांनंतर आढळला फॉस्टर्नचा मांजऱ्या साप

अमरावती- १५ वर्षांनंतर आढळला फॉस्टर्नचा मांजऱ्या साप

googlenewsNext

- धीरेंद्र चाकोलकर
अमरावती : अतिदुर्मीळ जिवांच्या गटात मोडणारा आणि मेळघाटच्या जंगलात पाच वर्षांपूर्वी नोंद करण्यात आलेल्या फॉस्टर्नचा मांजºया साप चक्क बडनेरा येथील बस आगारात आढळला. वसा संस्थेचे सर्पमित्र भूषण सायंके व मुकेश मालवे यांनी शुक्रवारी बडनेरा आगर गाठून या सापाला वाचविले.
वसा संस्थेचे प्राणिमित्र गणेश अकर्ते यांना बडनेरा आगरातील सुरक्षा रक्षक मारुती पंडित यांनी साप निदर्शनास आल्याची माहिती वसाला फोनवरून दिली. वसाचे भूषण सायंके व मुकेश मालवे यांनी हा साप पकडला तेव्हाच तो काही वेगळा असल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी सापाचा 'मार्फोमेट्रिक डेटा' व छायाचित्रे घेऊन पुण्याला पाठविली. पुण्याहून शुभम सायंके आणि गणेश अकर्ते यांनी मिळालेल्या सर्व माहितीचे आकलन करून, हा साप जिल्ह्यातील अतिदुर्मीळ ‘फॉस्टर्नचा मांजºया साप’ असल्याची पुष्टी केली. या सापाला पुन्हा त्याच्या नैसर्गिक अधिवासात परत जाता यावे, याकरिता वसाने उपवनसंरक्षक हेमंत मिणा यांना लेखी अर्ज देऊन सदर सापाला पुन्हा मेळघाटात पाठविले. अमरावती वनविभागाने जलद निर्णय घेऊन मेळघाट व्याघ्र प्रकल्पाचे उपवनसंरक्षक विनोद शिवकुमार यांच्याकडे वाचविलेला साप सुपूर्द केला.
तब्बल १५ वर्षांनंतर फॉस्टर्नचा मांजºया साप आढळल्याने सर्पमित्रांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. वसाने घेतलेल्या या दुर्मीळ नोंदीबद्दल वन्यजीवप्रेमी निखिल फुटाणे, सागर शृंगारे, गोपाल बारस्कर, शैलेश आखरे, रीतेश हंगरे, मुकेश मालवे, आकाश वानखेडे यांनी अभिनंदन केले.

मेळघाटातच मांजºया सापाची नोंद 
मेळघाटमधील कोह व कुंड वगळता जिल्ह्यात मांजºया सापाच्या नोंदी कुठेच नाहीत. २००३ मधील एका शोधप्रबंधात या सापाचा उल्लेख आढळतो. त्याचे शास्त्रीय नाव 'बॉइगा फॉर्स्टनी' आहे. १२ डिसेंबर २००३ नंतर २०१८ मध्ये १५ जूनला हा साप पुन्हा आढळून आला. २००३ मध्ये आढळलेल्या सापाची लांबी ४ फूट ५ इंच होती, तर बडनेरा बस डेपोमधून रेस्क्यू केलेल्या सापाची लांबी ३ फूट ९ इंच आहे. अमरावतीमध्ये साधा मांजºया आणि फॉस्टर्नचा मांजºया असे कॅट स्नेकचे दोन प्रकार आढळतात. 

दीडशे किलोमीटरचा प्रवास
सापाने मेळघाटातून बडनेरा आगारात तब्बल १५३ किमी अंतर बसने गाठल्याचा अंदाज सर्पमित्रांनी व्यक्त केला. १४ तारखेला सायंकाळी धारणीवरून मेळघाट व्याघ्र प्रकल्पातून बडनेरा आगरात पोहोचली. त्यात अनवधानाने हा साप चढला आणि सरळ उतरला तो १५३ किमी दूर बडनेराला.

पहिल्यांदाच मानवी वस्तीत
फॉस्टर्नचा मांजºया साप हा निमविषारी असून, जिल्ह्यात खूप दुर्मीळ आहे. मानववस्तीतील ही या सापाची पहिलीच नोंद आहे. दाट आणि उंच झाडे असलेली मेळघाटच्या जंगलात हा साप मुख्यत: आढळतो. या सापाला लागणारा अधिवास जिल्ह्यात कायम आहे, याची पुष्टी या घटनेने झाली आहे.

Web Title: Amravati- Fostera's cat snake found after 15 years

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.