शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले
2
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
3
DSP सिराजचा ऑन ड्युटी फॉर्म्युला! सर्वाधिक विकेट्स अन् १००० पेक्षा अधिक चेंडू टाकण्याचा मोठा पराक्रम
4
धक्कादायक! नागपुरात भर रस्त्यावर महिला पोलिसाला मारहाण करत विनयभंग
5
मोबाईलसाठी रेल्वेतील प्रवाशाच्या हातावर फटका, तरुणाने गमावला पाय; २० हजार रुपयेही पळवले
6
Pahalgam Attack: ते दहशतवादी पाकिस्तानी असल्याचे लष्कराने म्हटले नाही; संरक्षण मंत्रालयाचा खुलासा
7
१२,००० सॅमसंग स्मार्टफोनने भरलेला ट्रक चोरीला गेला; चोरट्यांनी ९१ कोटींच्या वस्तू लंपास केल्या
8
IND vs ENG : एक मालिका अन् दोन मालिकावीर! गंभीरमुळं गिलसोबत हॅरी ब्रूकला मिळाला हा पुरस्कार
9
अमित शाह मोडणार देशाच्या गृहमंत्र्यांचा रेकॉर्ड! जम्मू काश्मीरबद्दल सरकार घेणार आणखी एक मोठा निर्णय?
10
मारहाण, शिवीगाळ असं काहीच घडलं नाही; पुणे पोलिसांनी मुलींचे सगळेच आरोप फेटाळले
11
'भारत आगीशी खेळत आहे'; डोनाल्ड ट्रम्प, एस. जयशंकर यांच्याबद्दल खोटी विधाने केली पोस्ट, 'एक्स'ने खातीच केली बंद
12
iPhone 16: पहिल्यांदाच आयफोन १६ च्या खरेदीवर एवढी मोठी सूट!
13
भारत रशियाला युक्रेनविरुद्ध युद्धासाठी अप्रत्यक्षपणे निधी पुरवतोय, अमेरिकेचा आरोप!
14
येमेनमध्ये निमिषा प्रियाच्या अडचणी वाढल्या! मृताच्या भावाने पत्र लिहून केली मोठी मागणी
15
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित
16
आपच्या सत्येंद्र जैन यांना दिलासा, CBIच्या क्लोजर रिपोर्टवर कोर्टाचं शिक्कामोर्तब
17
माझा 'तो' व्हिडीओ रोहित पवारांना कुणी पाठवला? मंत्री मेघना बोर्डीकर म्हणाल्या...
18
राज ठाकरेंच्या 'मराठी'नंतर नितीश कुमारांची 'बिहारी' घोषणा; शिक्षक भरतीत नोकरी बिहारींनाच मिळणार
19
Siraj, IND vs ENG: ‘पूरा खोल दिए पाशा...’; सिराजच्या 'मॅचविनिंग' गोलंदाजीवर ओवेसींची हैदराबादी शैलीत स्तुती
20
कमाल झाली राव! रशियन महिलेने सांगितली भारतीय पुरुषाशी लग्न करण्याची खास कारणं, जिंकलं मन

कोरडा दुष्काळ जाहीर करण्याची अमरावतीतील शेतक-यांची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 19, 2017 20:03 IST

यंदा पावसाची सुरुवात उशिरा झाल्याने अमरावती जिल्ह्यातील शेतक-यांना दुबार पेरणी करावी लागली. पावसाने दडी दिल्यामुळे शेतक-यांना पीकमोड करावी लागली. यंदा पावसाने दमदार हजेरी लावली नसल्याने कोरडा दुष्काळ जाहीर करावा, अशी मागणी संपूर्ण जिल्ह्यातील शेतकरी करीत आहेत. 

वीरेंद्रकुमार जोगी/ अमरावती, दि. 19  : यंदा पावसाची सुरुवात उशिरा झाल्याने अमरावती जिल्ह्यातील शेतक-यांना दुबार पेरणी करावी लागली. पावसाने दडी दिल्यामुळे शेतक-यांना पीकमोड करावी लागली. यंदा पावसाने दमदार हजेरी लावली नसल्याने कोरडा दुष्काळ जाहीर करावा, अशी मागणी संपूर्ण जिल्ह्यातील शेतकरी करीत आहेत. हवामान खात्याच्या अंदाजानुसार १ जून ते ३० सप्टेंबर या कालावधीत अमरावती जिल्ह्यात ८१४ मिमी पाऊस अंदाजित आहे. ऑगस्ट महिन्यात २० तारखेपर्यंत ५५७ मिमी पाऊस व्हावा, असा हवामान खात्याचा अंदाज होता. मात्र प्रत्यक्षात १९ आॅगस्टपर्यंत ३२४.२ मिमी पाऊस झाला आहे. जिल्ह्यात आतापर्यंत केवळ ३९.८ टक्के पाऊस झाला आहे. गतवर्षी याच कालावधीपर्यंत ७३८ मिमी पाऊस झाला होता. पावसाचे अत्यल्प प्रमाण असल्यामुळे अनेक तालुक्यात दुष्काळाची परिस्थिती निर्माण झाली आहे. अचलपूर उपविभागातील अचलपूर, अंजनगाव सुर्जी, दर्यापूर, चिखलदरा व धारणी तालुक्यात यंदा पावसाने ४० टक्के देखील पाऊस झाला नाही. अचलपूर तालुक्यात ३१.२, दर्यापूर ३५.६, अंजनगाव २७.१, चिखलदरा ३७.५ व धारणी तालुक्यात केवळ ४०.१ टक्के पाऊस झाला आहे.  जिल्ह्यात सर्वाधिक पाऊस चांदूररेल्वे तालुक्यात झाला असून येथील सरासरी ५१.३ एवढी आहे. जिल्ह्याच्या पेरणीचा अंदाज घेतला तर अंजनगाव तालुक्यात अंदाजित पेरणी क्षेत्राच्या तुलनेत ६७०० हेक्टर, अचलपूर ५४३१, चांदूर बाजार १२८४७, चांदूररेल्वे १६२२, तिवसा २८१८, मोर्शी ९३६२, वरुड २७७८, दर्यापूर १९८५, धारणी ४१५, चिखलदरा १९९४, भातकुली १३४२, नांदगाव खंडेश्वर, २१२० व अमरावती तालुक्यात १३४२ हेक्टर क्षेत्रात कमी पेरणी झाली आहे. धामणगाव तालुक्यात अंदाजित क्षेत्राच्या तुलनेत ४११ हेक्टरवर जादा पेरणी झाली आहे. दर्यापूर, अंजनगाव, भातकुली तालुक्यातील अनेक शेतकºयांनी आपल्या शेतातील उभ्या पिकावर नांगर फिरविला आहे. धामणगाव, तिवसा, चांदूररेल्वे, मोर्शी, चांदूरबाजार तालुक्यातील पिके वाढली. मात्र पाऊस झाला नसल्याने रोगाचा प्रादुर्भाव झाला. त्यामुळे यावर्षी उत्पादन निम्मे होण्याची शक्यता शेतकरी वर्तवित आहेत.  शेतकरी पिकविम्यापासून वंचित पंतप्रधान पीकविमा योजनचा लाभ शेतकºयांनी घ्यावा, यासाठी वाढ देण्यात आली होती. मात्र जाचक अटीमुळे अनेकांना पीकविमा काढता आला नाही. यामुळे शेतकरी पीकविम्यापासून वंचित राहिले आहे. त्यांना नुकसान भरपाई मिळण्याची शक्यतादेखील कमी आहे.  जिल्ह्यातील पिकांची अवस्था पाहून जिल्हापरिषदेने दुष्काळ जाहीर करावा, असा ठराव घेतला असून तो शासनाकडे पाठविला आहे. जिल्हा परिषदेची कृषी समिती जिल्ह्यातील पिकांची माहिती घेत आहेत. राज्य शासनाने अमरावती जिल्ह्यात कोरडा दुष्काळ जाहीर करावा, अशी आमची मागणी आहे. - नितीन गोंडाने, अध्यक्ष, जिल्हा परिषद  १० एकर जमिनीवर सोयाबीन पेरले; पण उगवण झाली नसल्याने त्यावर रोटावेटर फिरविले. तूर उगवली पण वाढ झाली नाही, मूग, उडीद व हायब्रिड ज्वारीलादेखील मोड आली आहे. खरीप झाला नाही. शासनाने कोरडा दुष्काळ जाहीर करावा. - दिलीप शेळके, शेतकरी, रासेगाव, अचलपूर  यंदा आस्मानी व सुल्तानी संकट शेतकºयांवर ओढावले आहे. कमी पावसाचा फटका यामुळे शेतीला लागलेला खर्चही निघेनासा झाला आहे. शासनाने शेतकºयांना मदत करावी. - धीरज दवे, शेतकरी, चांदूर बाजार

टॅग्स :Farmerशेतकरी