'एम.सीएच.'मध्ये अमरावतीच्या डाॅक्टरला सुवर्णपदक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 24, 2021 04:07 IST2021-01-24T04:07:05+5:302021-01-24T04:07:05+5:30
अमरावती : एम.सीएच. (मास्टर ऑफ चरुर्गी) जनरल सर्जरीच्या श्रेणीतील अभ्यासक्रम शाखेच्या अंतिम परीक्षेत स्थानिक प्रशांतनगर येथील रहिवासी युवा वैद्यक ...

'एम.सीएच.'मध्ये अमरावतीच्या डाॅक्टरला सुवर्णपदक
अमरावती : एम.सीएच. (मास्टर ऑफ चरुर्गी) जनरल सर्जरीच्या श्रेणीतील अभ्यासक्रम शाखेच्या अंतिम परीक्षेत स्थानिक प्रशांतनगर येथील रहिवासी युवा वैद्यक रोहन दिगर्से यांनी सुवर्णपदक पटकावले. सध्या ते येथील सुपरस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये 'न्यूरोसर्जन' म्हणून कार्यरत आहेत.
रोहन दिगर्से यांनी नागपूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून एम.बी.बी.एस.ची पदवी सुवर्णपदकासह मिळविली. मुंबईच्या के.ई.एम. रुग्णालयातून एम.एस., लखनौच्या किंग जॉर्ज मेडिकल युनिव्हर्सिटीतून एम.सीएच. न्यूरोसर्जरीचे शिक्षण घेतले. एम.सीएच. न्यूरोसर्जरीच्या अंतिम वर्षाच्या परीक्षेत त्यांनी सुवर्णपदक पटकावले. प्रतिकूल परिस्थितीत रोहन दिगर्से यांनी ध्येय साध्य केले. लखनौ येथे झालेल्या पदवीदान समारंभात रोहन दिगर्से यांना राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या ऑनलाइन उपस्थितीत उत्तरप्रदेशच्या राज्यपाल आनंदीबेन पटेल यांच्या हस्ते "सुरसरी दयाल मेमोरियल गोल्ड मेडल" प्राप्त झाले. कार्यक्रमाला किंग जॉर्ज वैद्यकीय विश्वविद्यालयाचे कुलगुरू लेफ्टनंट जनरल बिपिन पुरी तसेच कॅबिनेटमंत्री सुरेशकुमार खन्ना उपस्थित होते.