अमरावती विभागातील १,६४७ ग्रामपंचायती हगणदारीमुक्त, अमरावती जिल्ह्यातील सर्वाधिक ४८७ ग्रापंचा समावेश
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 4, 2017 17:22 IST2017-10-04T17:13:22+5:302017-10-04T17:22:27+5:30
विभागात स्वच्छ भारत मिशन अंतर्गत ग्रामीण भागात राबविलेल्या अभियानात तीन हजार ९२५ पैकी एक हजार ६४७ ग्रामपंचायती हगणदारीमुक्त झाल्या आहेत. यामध्ये सर्वाधिक ४८७ ग्रामपंचायती अमरावती जिल्ह्यामधील आहेत.

अमरावती विभागातील १,६४७ ग्रामपंचायती हगणदारीमुक्त, अमरावती जिल्ह्यातील सर्वाधिक ४८७ ग्रापंचा समावेश
अमरावती - विभागात स्वच्छ भारत मिशन अंतर्गत ग्रामीण भागात राबविलेल्या अभियानात तीन हजार ९२५ पैकी एक हजार ६४७ ग्रामपंचायती हगणदारीमुक्त झाल्या आहेत. यामध्ये सर्वाधिक ४८७ ग्रामपंचायती अमरावती जिल्ह्यामधील आहेत. यापैकी ६०७ ग्रामपंचायतींचे समितीच्या मार्फत तपासणी करण्यात येऊन शिक्कामोर्तब करण्यात आलेले आहे.
अमरावती विभागात एकूण तीन हजार ९२५ ग्रामपंचायती आहेत. यापैकी २१६ ग्रामपंचायती मार्च २०१५ अखेर, तर २०१६-१७ मध्ये सद्यस्थितीत एक हजार ४३१ ग्रामपंचायती हगणदारीमुक्त झालेल्या आहेत. ही ४२.०९ टक्केवारी आहे यापैकी ६०७ ग्रामपंचायतींचे समितीद्वारा तपासणीदेखील झालेली आहे. आतापर्यंत अमरावती जिल्ह्यातील ८३९ पैकी ४८७, अकोला जिल्ह्यातील ५३२ पैकी २१६, बुलडाणा जिल्ह्यातील ८६६ पैकी ३२४, वाशिम जिल्ह्यातील ४९० पैकी २१८, तर यवतमाळ जिल्ह्यातील १,१९८ पैकी ४०७ ग्रामपंचायती हगणदारीमुक्त झालेल्या आहेत.
विभागातील सात तालुके हगणदारीमुक्त झालेले आहेत. अमरावती जिल्ह्यातील अंजनगाव सुर्जी, चांदूर रेल्वे व तिवसा, बुलडाणा जिल्ह्यातील मलकापूर व शेगाव, यवतमाळ जिल्ह्यातील बाभूळगाव व वाशिम जिल्ह्यातील कारंजा या तालुक्यांचा समावेश आहे. २०१२ च्या सर्वेक्षणानुसार यासर्व तालुक्यात १,३९,६५४ कुटुंबे आहेत व यापैकी १,३९,४०२ कुटुंबाकडे शौचालय आहेत. ही ९९.८२ टक्केवारी आहे.
चार लाख २६ हजार कुटुंबाकडे शौचालयेच नाहीत
बेसलाईन सर्वेक्षणानुसार विभागात १५ लाख ३५ हजार कुटुंब आहेत. यापैकी ११ लाख १० हजार कुटुंबाकडे शौचालय आहेत. ही ७२.२३ टक्केवारी आहे. चार लाख २६ हजार कुटुंबाकडे अद्यापही शौचालय नाहीत. यामध्ये अमरावती जिल्ह्यात ५२,३७६, अकोला जिल्ह्यात ५०,२३३, बुलडाणा जिल्ह्यात १,१०,२४०, वाशिम जिल्ह्यात ६१,३३५ व यवतमाळ जिल्ह्यात १,५२,४०० कुटूंबाकडे शौचालय नाहीत, ही वस्तुस्थिती आहे.