अमरावती पदवीधर मतदारसंघ निवडणूक; दुपारी १२ वाजेपर्यंत १५.९४ टक्के मतदान
By गणेश वासनिक | Updated: January 30, 2023 13:37 IST2023-01-30T13:36:51+5:302023-01-30T13:37:33+5:30
मतदानाला सोमवारी सकाळी ८ वाजेपासून सुरुवात

अमरावती पदवीधर मतदारसंघ निवडणूक; दुपारी १२ वाजेपर्यंत १५.९४ टक्के मतदान
अमरावती : अमरावती पदवीधर मतदारसंघाच्या सार्वत्रिक निवडणूकींसाठी मतदानाला सोमवारी सकाळी ८ वाजेपासून सुरुवात झाली. दुपारी १२ वाजेपर्यंत विभागातील सर्व जिल्ह्यांमध्ये २६२ मतदान केंद्रावर सरासरी १५.९४ टक्के मतदान झाल्याची माहिती निवडणूक अधिकारी तथा विभागीय आयुक्त कार्यालयाने दिली आहे.
अमरावती जिल्ह्यात ७५ मतदान केंद्रावर दुपारी १२ वाजेपर्यंत १३.६९ टक्के मतदान झाले आहे. अकोला जिल्ह्यात ६१ मतदान केंद्रावर दुपारी १२ वाजेपर्यंत १४.६५ टक्के मतदान झाले आहे. बुलडाणा जिल्ह्यात ५२ मतदान केंद्रावर दुपारी १२ जेपर्यंत १७.८९ 9 टक्के मतदान झाले आहे. यवतमाळ जिल्ह्यात ४८ मतदान केंद्रावर दुपारी १२ वाजेपर्यंत १८.०७ टक्के मतदान झाले आहे. तर वाशीम जिल्ह्यात २६ मतदान केंद्रावर दुपारी १२ वाजेपर्यंत १९.३९ टक्के मतदान झाले आहे. मतदानाची प्रक्रिया शांततेत सुरु आहे.