शहरं
Join us  
Trending Stories
1
ते कुणालाच नको होते; एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदाबाबत संजय राऊत यांचा नवा दावा
2
राष्ट्रवादीकडे त्यावेळी मुख्यमंत्रीपदासाठी योग्य उमेदवार नव्हता; शरद पवारांनी सगळंच सांगितलं
3
पतंजलीची सोन पापडी गुणवत्ता चाचणीत फेल, सहाय्यक व्यवस्थापकासह तिघांवर कारवाई
4
आनंदवार्ता : यंदा धो-धो बरसणार; मान्सून आज अंदमानात तर ३१ मे रोजी केरळात धडकणार
5
गॅसच्या टँकरचा भीषण स्फोट, आगीत घरे व वाहने भक्ष्यस्थानी; शेलपिंपळगावातील घटना
6
काश्मीरमध्ये निवडणुकीपूर्वी दुहेरी हल्ला; भाजपच्या माजी सरपंचाची गोळ्या झाडून हत्या
7
दिल्लीत महाभ्रष्टाचाऱ्याला इंडी आघाडीने स्वीकारले; काँग्रेसला ४ जागाही लढवता आल्या नाहीत, मोदींचा हल्लाबोल 
8
आजचे राशीभविष्य - १९ मे २०२४, अचानक धनलाभाची शक्यता,व्यावसायिक क्षेत्रात लाभ होतील
9
'हार मानणार नाही..'; कार्तिक आर्यनच्या 'चंदू चँपियन'चा ट्रेलर, मराठमोळ्या हेमांगी कवीने वेधलं लक्ष
10
मविआ राज्यात ४६ जागा जिंकणार; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी व्यक्त केला विश्वास
11
केजरीवाल यांचे माजी पीए बिभव कुमार अखेर अटकेत; स्वाती सहज बाहेर पडल्या, ‘आप’ने जारी केला व्हिडीओ 
12
'सिंघम 3' च्या सेटवरुन अजय देवगण-जॅकी श्रॉफचा फाईट सीन लीक, व्हिडीओ व्हायरल
13
आता भाजप सक्षम, सगळे निर्णय स्वबळावर; रा.स्व. संघाची मदत घेण्याबाबत जे.पी.नड्डा यांचे मत
14
RCBच्या रोमहर्षक विजयानंतर विराट कोहली रडला अन् अनुष्का शर्माही... Video Viral 
15
RCB चा प्ले ऑफमध्ये प्रवेश पक्का; रचीनचा Run Out अन् ड्यू प्लेसिसच्या स्टनर कॅचने फिरला सामना 
16
प्रज्वल रेवण्णांच्या अडचणीत वाढ, ब्लू कॉर्नर नोटीसनंतर अटक वॉरंट जारी
17
आग्र्यात बूट व्यावसायिकांच्या घरावर छापा, सापडलं कोट्यवधींचं घबाड; नोटांचे बंडल पाहून अधिकारीही चक्रावले
18
आम्ही भाजपावाले आहोत, आम्हाला घाबरणं माहिती नाही, पाकव्याप्त काश्मीरचा ताबा मिळवणारच- अमित शाह
19
"संविधानाचे रक्षण करणे हेच आमचे ध्येय, कारण...", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल
20
OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 

Corona Virus in Amravati; अमरावतीमध्ये एक कोरोना पॉझिटिव्ह, बाधितांची संख्या पोहचली सहावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 18, 2020 9:01 AM

शहरातील बफर झोनमध्ये मृत ऑटोचालकाच्या २२ वर्षीय मुलाचा थ्रोट स्वॅब रिपोर्ट शुक्रवारी रात्री २ वाजता पॉझिटीव्ह आला. शहरात कोरोनाग्रस्तांची संख्या आता सहावर पोहचली आहे.

ठळक मुद्देसंपर्कातील १५ जणांचे स्वॅब तपासणीला

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : येथील १६ वर्षीय मुलाचा कोरोना तपासणी अहवाल शनिवारी पहाटे पॉझिटिव्ह आला. अमरावती जिल्ह्यातील एकूण कोरोनाबधितांची संख्या आता सहा झाली आहे. बफर झोन घोषित असलेल्या अमरावती शहरातील नुरानी चौकात १२ एप्रिल रोजी घरात मृत्यू पावलेल्या ५३ वर्षीय ऑटोचालकाचा तो मुलगा होय. मृताच्या कुटुंबातील चार व्यक्तींना १३ एप्रिल रोजी होम क्वारंटाइन करण्यात आले होते. बाधितांच्या संपर्कातील १५ व्यक्तींची शनिवारी जिल्हा सामान्य रुग्णालयात तपासणी करून त्यांना सामाजिक न्याय विभागाच्या मुलींच्या वसतिगृहात क्वारंटाइन केले आहे.  हैदरपुरा व हाथीपुरा भागात कोरोनाचे पाच पॉझिटिव्ह रुग्ण आढळल्यामुळे महापालिका आयुक्त प्रशांत रोडे यांनी हा परिसर बफर झोन व याअंतर्गत आठ कन्टोन्मेंट घोषित केले आहे. या परिसरात जाणारे सर्व रस्ते सील करण्यात आलेत. जंतुनाशकाची फवारणी करण्यात आली. या बफर झोनमध्ये आरोग्य विभागाच्या १०० पेक्षा अधिक पथकांद्वारे गृहभेटी सुरू आहेत. दरम्यान, याच परिसरातील बाबा चौक व नुरानी चौकादरम्यान राहणाºया ५३ वर्षीय ऑटोचालकाचा १२ एप्रिलला राहत्या घरी मृत्यू झाला. त्यापूर्वी त्यांना शहरातील एका खासगी रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले होते. मृत्यू हृदयाच्या आजाराने झाल्याचे डॉक्टरांचे निदान होते, अशी माहिती महापालिकेचे वैद्यकीय आरोग्य अधिकारी विशाल काळे यांनी दिली. त्यांचा थ्रोट स्वॅब घेण्यात आला नव्हता. मृताच्या अंत्यसंस्काराला पाच व्यक्तींना परवानगी देण्यात आली होती. त्याच दिवशी या कुटुंबातील पाच व्यक्तींचे थ्रोट स्वॅब घेण्यात आले. त्यांना गृह विलगीकरणात ठेवण्यात आले. मात्र बाधित युवक विलगीकरण काळात अनेकदा बाहेर जाऊन आल्याने त्याच्या संपर्कात किती व्यक्ती आल्या, हे शोधण्याचे आव्हान आरोग्य विभागासमोर आहे. किमान २५ ते ३० व्यक्ती या युवकाच्या संपर्कात आल्याची माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष शैलेश नवाल यांनी दिली.

नुरानी चौकातील १८ वर्षीय युवकाचा स्वॅब पॉझिटिव्ह आलेला आहे. त्याच्या संपर्कात २५ ते ३० व्यक्ती असल्याचे निष्पन्न झाले आहे. सर्वांचे थ्रोट स्वॅब घेण्यात आले. त्यांना क्वारंटाइन करण्यात आले आहे. - शैलेश नवाल, जिल्हाधिकारी, अमरावती

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस