Amravati: अमरावती कृषी उत्पन्न बाजार समितीत सहकार पॅनलचे खाते उघडले, मिलिंद तायडे विजयी
By गणेश वासनिक | Updated: April 29, 2023 11:32 IST2023-04-29T11:31:48+5:302023-04-29T11:32:25+5:30
Amravati: भातकुली बाजार समितीच्या मतमोजणीला सकाळी ८ वाजता पासून प्रारंभ झाला आहे. सहकार पॅनेलची विजयी सुरुवात झाली असून अनुसूचित जाती राखीव मतदार संघातून मिलिंद तायडे हे विजयी झाले आहेत.

Amravati: अमरावती कृषी उत्पन्न बाजार समितीत सहकार पॅनलचे खाते उघडले, मिलिंद तायडे विजयी
- गणेश वासनिक
अमरावती : अमरावती- भातकुली बाजार समितीच्या मतमोजणीला सकाळी ८ वाजता पासून प्रारंभ झाला आहे. सहकार पॅनेलची विजयी सुरुवात झाली असून अनुसूचित जाती राखीव मतदार संघातून मिलिंद तायडे हे विजयी झाले आहेत. तर हमाल मापारी मतदार संघातून बंडू वानखडे विजयी झाले आहे. सहकार पॅनल ची विजयी सुरुवात झाली आहे.
माजी मंत्री तथा आमदार यशोमती ठाकूर गटाचे तथा महाविकास आघाडी उमेदवार मिलिंद तायडे विजयी घोषित करण्यात आले आहे. एकूण १८ जागासाठी ही निवडणूक शुक्रवारी पार पडली..