शहरं
Join us  
Trending Stories
1
गुवाहाटीची खरी कथा मला विचारूनच लिहावी लागेल- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
2
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
3
अमिताभ बच्चन यांनी विकले २ लक्झरी फ्लॅट्स; ‘बिग बीं’ची प्रॅापर्टीमधून बंपर कमाई, कितीमध्ये झाली ही ‘सुपर डील’?
4
"आम्ही कार्यक्रम वेळेत सुरु केलेला, पण..."; माधुरी दीक्षितच्या उशीरा येण्यामागचं खरं कारण आयोजकांनी सांगितलं
5
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
6
१३,००० कोटींचे कोकेन प्रकरण: डॉन वीरूच्या मुलाला पकडण्यासाठी १८० देशांची फौज; इंटरपोलची रेड नोटीस जारी
7
पालघरमधील तीन नगरपरिषदा, एका नगरपंचायतीत रणधुमाळी; यंदा कोण मारणार बाजी?
8
“निवडणूक आयोगाचा कारभार ‘दस नंबरी’, दुबार तिबार नावांची जबाबदारी कोणाची?”: हर्षवर्धन सपकाळ
9
२०२६ला डबल धमाका, ७ राशींवर असीम शनि कृपा; उत्पन्नात लक्षणीय वाढ, घर खरेदीचे स्वप्न पूर्ण!
10
'चिप'ची भीती दाखवून मुलीवर अत्याचार; जन्मदात्या आईचे हादरवणारं कृत्य, कोर्टाने दिली १८० वर्षांची शिक्षा!
11
बदलापुरात युतीत लढाई? तर अंबरनाथमध्ये मविआत तडजोड? निवडणुकांमध्ये चुरशीची लढाई
12
“मतदार याद्यांमध्ये घोळ, सत्ताधाऱ्यांकडून कबूल, दुबार मतदानावर आयोग गप्प का?”: सुप्रिया सुळे
13
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
14
रायगडमध्ये १० नगरपरिषदांमध्ये धूम युतीची की आघाडीची..? सर्व राजकीय पक्षांकडून हालचाली
15
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
16
चेंबूरमधील मेंदी प्रकरणाला नवी कलाटणी; शाळा प्रशासनाने सर्व आरोप फेटाळून लावले
17
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
18
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू
19
हिंदुजा समूहाला जागतिक पातळीवर पोहोचवणारे चेअरमन गोपीचंद हिंदुजा यांचे निधन
20
मंत्री गुलाबराव पाटील कॅबिनेटमध्ये संतापले; पूरग्रस्त शेतकरी आणि नागरिकांबाबतचा होता विषय

अमरावती : पावणेदोन कोटींचा कर बुडवून व्यापा-याचा पोबारा, राजापेठ ठाण्यात गुन्हा दाखल 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 13, 2018 21:08 IST

पावणेदोन कोटींचा कर बुडवून व्यापा-याने पोबारा केल्याचा धक्कादायक प्रकार शुक्रवारी सायंकाळी शहरात उघडकीस आला.

अमरावती : पावणेदोन कोटींचा कर बुडवून व्यापा-याने पोबारा केल्याचा धक्कादायक प्रकार शुक्रवारी सायंकाळी शहरात उघडकीस आला. विक्रीकर अधिका-यांच्या तक्रारीवरून राजापेठ पोलिसांनी नीलेशकुमार गोपालदास सहजवानी (रा. विश्वकर्मानगर, इंदूर) याच्याविरुद्ध भादंविच्या कलम ४०६, ४०९, ४२०, १२०, (ब), महाराष्ट्र मूल्यवर्धित कायदा कलम ७४१ (बी), ७४१ (अ), (आय), ७४ (२), ७४३ (एम) अन्वये गुन्हा नोंदविला आहे.      

आरोपी नीलेश सहजवानी याने अमरावतीमधील रविनगरात स्वस्तिक एन्टरप्रायझेस नावाने कार्यालय उघडले होते.  त्याने स्वस्तिक एन्टरप्रायझेस नावाने विक्रीकर विभागात नोंदणी केली. तेलबियांसह अन्य काही वस्तूंची खरेदी व विक्री करताना त्याने संबंधित ग्राहकांकडून कर वसूल केला. मात्र, त्या आर्थिक व्यवहारानुसार आरोपी नीलेश सहजवानी याने विक्रीकर विभागाकडे पैसे भरले नाहीत तसेच सन २०१३, १४ व १५ मध्ये १४ कोटी २९ लाख १३ हजार ६७५ रुपयांची उलाढाल लपविली. या रकमेवरील ६९ लाख ६९ हजार १२८ रुपयांचा कर शासनाच्या तिजोरीत भरला नाही. एकंदर नीलेशकुमारने १ कोटी ७३ लाख २१ हजार ९४५ रुपयांचा कर न भरता अपहार केला. हा गंभीर प्रकार विक्रीकर विभागाच्या लक्षात येताच, महिला अधिका-याने राजापेठ पोलीस ठाणे गाठून तक्रार नोंदविली. त्यानुसार नीलेशकुमार सहजवानीविरुद्ध पोलिसांनी गुन्हा नोंदविला.

रविनगरातील कार्यालयाला कुलूपपोलिसांनी नीलेशकुमार याच्या रविनगरातील कार्यालयाची पाहणी केली असता, ते बंद आढळले. त्याने शासनाची फसवणूक करून पोबारा केल्याचे पोलिसांच्या लक्षात आले. त्याला अटक करण्यासाठी पोलीस पथक लवकरच इंदूरला जाणार आहे. 

आरोपीने स्वस्तिक एन्टरप्रायझेसचे कार्यालय थाटून तेलबियांसह अन्य काही वस्तूंची खरेदी-विक्री केली. मात्र, पैसा गोळा करून शासनाकडे कर भरला नाही. त्यानुसार विक्रीकर विभागाच्या अधिकाºयांच्या तक्रारीवरून गुन्हा नोंदविण्यात आला आहे. अरुण मेश्राम, सहायक पोलीस उपनिरीक्षक, राजापेठ ठाणे.

टॅग्स :Crimeगुन्हा