Amravati: ‘भूविकास’चा निघाला बोजा, शेतकऱ्यांची पाच कोटींची कर्जमाफी, १६८ कर्मचाऱ्यांचीही देणी प्रक्रियेत

By गजानन उत्तमराव मोहोड | Published: May 13, 2023 05:00 PM2023-05-13T17:00:46+5:302023-05-13T17:00:59+5:30

Amravati News: दीर्घमुदती कर्जाची थकबाकी वाढल्याने भूविकास बँक ३० मार्च २०१३ ला अवसायनात गेली. त्यामुळे १९८ कर्जदारांच्या सात-बारावर मुद्दल व व्याजासह ५.१५ कोटींचा बोजा कायम होता.

Amravati: Burden of 'Bhuvikas' released, loan waiver of 5 crores of farmers, 168 employees are also in debt process | Amravati: ‘भूविकास’चा निघाला बोजा, शेतकऱ्यांची पाच कोटींची कर्जमाफी, १६८ कर्मचाऱ्यांचीही देणी प्रक्रियेत

Amravati: ‘भूविकास’चा निघाला बोजा, शेतकऱ्यांची पाच कोटींची कर्जमाफी, १६८ कर्मचाऱ्यांचीही देणी प्रक्रियेत

googlenewsNext

- गजानन मोहोड
अमरावती : दीर्घमुदती कर्जाची थकबाकी वाढल्याने भूविकास बँक ३० मार्च २०१३ ला अवसायनात गेली. त्यामुळे १९८ कर्जदारांच्या सात-बारावर मुद्दल व व्याजासह ५.१५ कोटींचा बोजा कायम होता. आता बोजा हटविण्याच्या अनुषंगाने ८ मार्च २०२३ ला जिल्हाधिकाऱ्यांना प्रस्ताव सादर झाल्याने थकबाकीदार शेतकऱ्यांचा सात-बारा कोरा झालेला आहे.

दीर्घमुदती कर्ज उपलब्ध करणाऱ्या भूविकासचा चांगलाच बोलबाला होता. सन १९३५ पासून सुरू झालेल्या या बँकेचा कारभार सन १९९५-९६ पर्यंत व्यवस्थित सुरू होता. खातेधारकांचीही संख्या चांगली होती. त्यानंतर शासनाने हमी नाकारली व नाबार्डनेही पतपुरवठा बंद केल्याने ही बँक अडचणीत आली व थकबाकीही रखडल्याने अखेर ही बँक ३० मार्च २०१३ रोजी अवसायनात काढण्यात आली. त्यामुळे बँकेतील १६२ कर्मचाऱ्यांनाही फटका बसला होता. या सर्व कर्मचाऱ्यांना त्यांच्या लाभाची प्रतीक्षा होती.

Web Title: Amravati: Burden of 'Bhuvikas' released, loan waiver of 5 crores of farmers, 168 employees are also in debt process

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.