शहरं
Join us  
Trending Stories
1
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
2
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
3
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
4
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
5
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
6
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
7
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
8
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
9
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
10
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
11
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
12
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
13
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
14
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
15
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
16
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
17
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
18
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
19
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
20
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
Daily Top 2Weekly Top 5

अमरावतीत भाजप, जिल्ह्यात काँग्रेस

By admin | Updated: February 24, 2017 00:06 IST

महापालिकेसह जिल्हा परिषद व पंचायत समित्यांचे चित्र गुरुवारी उशिरापर्यंत स्पष्ट झाले. महापालिकेत ४५ जागा मिळवित भाजपने एकहाती सत्ता मिळविली तर

अनपेक्षित : महापालिकेत स्पष्ट बहुमत, मिनीमंत्रालयात आघाडीमहापालिकेसह जिल्हा परिषद व पंचायत समित्यांचे चित्र गुरुवारी उशिरापर्यंत स्पष्ट झाले. महापालिकेत ४५ जागा मिळवित भाजपने एकहाती सत्ता मिळविली तर मिनी मंत्रालयासाठी २६ जागा काबीज करुन काँग्रेस प्रमुख पक्ष म्हणून समोर आला आहे. महापालिकेत भाजपला यापूर्वी निवडणुकीच्या तुलनेत ३८ जागा अधिक मिळाल्या तर जिल्हा परिषदेत विद्यमान सत्तापक्ष असणाऱ्या काँग्रेसला यावेळी एक जागा अधिक मिळाली आहे. दोन्ही प्रमुख पक्षाला सत्तास्थापनेचा मार्ग सुकर झाला आहे. अमरावती: महायुती व आघाडी यांची ताटातूट झाल्यानंतर सर्वपक्ष स्वबळावर लढले. एकेका मतांसाठी झुंज झाली. त्यामुळे सत्तेचा कौल कुणाला? याविषयी संभ्रम होता. मात्र गुरुवारी दुपारी १२ नंतर चित्र स्पष्ट व्हायला लागले. मतमोजणीअंती महापालिकेत ४५ जागी विजयी मिळवित भाजपने स्पष्ट बहुमत मिळविले. १५ जागा मिळवित काँग्रेस दुसऱ्या स्थानावर राहिली. एमआयएम पक्षाने महापालिकेत पहिल्यांदाच १० जागेवर विजय नोंदवून लक्ष वेधले आहे. या निवडणुकीत सेनेला ४ जागांचा फटका बसला आहे. सेनेचे ७ सदस्य विजयी झालेत. यापूर्वी १७ सदस्य असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसला मात्र यावेळी खातेही उघडता आले नाही.मिनीमंत्रालयाच्या ५९ सदस्यांच्या सभागृहात २६ जागा मिळवित काँग्रेस सर्वात मोठा पक्ष समोर आला. काँग्रेस समर्थित रिपाइं (गवई) गटाला एक जागा मिळाल्याने काँग्रेस गोटात २७ सदस्य झालेत. बहुमतासाठी काँग्रेसला केवळ तीन सदस्यांची गरज आहे. या सभागृहात भाजपकडे १३ संख्याबळ आहे. भाजपला २०१२ च्या तुलनेत एक जागेचा फायदा झाला आहे. मात्र शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसला यावेळी फटका बसला आहे. यापूर्वी शिवसेनेचे सात सदस्य होते. यावेळी मात्र तीन सदस्यांवर समाधान मानावे लागले. राष्ट्रवादीचे सात सदस्य होते. त्यातुलनेत या निवडणुकीत पाच सदस्य निवडून आलेत. बसपाला एका जागेवर विजय मिळविता आला. यापूर्वी दोन सदस्य होते. प्रहारचे पाच सदस्य यावेळेही कायम आहेत. युवा स्वाभिमानने खाते उघडले आहे. यावेळी प्रथमच दोन सदस्य निवडून आले आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटना, लढा संघटना व अपक्ष असे प्रत्येकी एक सदस्य विजयी झालेत.