शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
5
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
6
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
7
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
8
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
9
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
10
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
11
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
12
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
13
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
14
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
15
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
16
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
17
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
18
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
19
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
20
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
Daily Top 2Weekly Top 5

महाराष्ट्रात अमरावती, अकोल्यामध्ये सर्वाधिक तापमान

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 5, 2019 15:36 IST

मध्यप्रदेश, गुजरात व राजस्थानवर उष्णतेची लाट असल्यामुळे तेथून येणाऱ्या उष्ण वाऱ्यांमुळे अमरावती व अकोल्यातील तापमानात वाढ झाली आहे.

ठळक मुद्दे मध्यप्रदेश, गुजरात व राजस्थानवर उष्णतेची लाट असल्यामुळे तेथून येणाऱ्या उष्ण वाऱ्यांमुळे अमरावती व अकोल्यातील तापमानात वाढ झाली आहे. गुरुवारी (4 एप्रिल) महाराष्ट्रातील अन्य शहरांच्या तुलनेत अकोला व अमरावतीत सर्वाधिक तापमानांची नोंद झाली.अमरावतीत ४३.८, तर अकोल्यात ४४ डिग्री सेल्सिअस तापमान आहे. 

अमरावती - मध्यप्रदेश, गुजरात व राजस्थानवर उष्णतेची लाट असल्यामुळे तेथून येणाऱ्या उष्ण वाऱ्यांमुळे अमरावती व अकोल्यातील तापमानात वाढ झाली आहे. गुरुवारी (4 एप्रिल) महाराष्ट्रातील अन्य शहरांच्या तुलनेत अकोला व अमरावतीत सर्वाधिक तापमानांची नोंद झाली आहे. अमरावतीत ४३.८, तर अकोल्यात ४४ डिग्री सेल्सिअस तापमान आहे. 

शुक्रवारनंतर उष्णतेची लाट ओसरणार असून, पश्चिम विदर्भ ते मध्य महाराष्ट्र, कर्नाटकपर्यंत कमी दाबाच्या स्थितीमुळे पूर्व विदर्भात शुक्रवारी वादळी पावसाची शक्यता आहे. शिवाजी कृषी महाविद्यालयाचे हवामान तज्ज्ञ अनिल बंड यांनी वर्तविलेल्या अंदाजानुसार, सद्यस्थितीत अमरावती जिल्ह्यात पश्चिमेकडून वारे वाहत आहे. उष्ण वाऱ्यामुळे अमरावतीच्या तापमानाने उच्चांक गाठला आहे. बुधवारी अमरावतीत ४३.८ डिग्री सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. गुरुवारीही तीच नोंद कायम राहिली. शुक्रवारनंतर उष्णतेची लाट ओसरणार असून, कमाल तापमान थोडे कमी होण्याची शक्यता आहे.

बुधवारी अमरावतीत ४३.८ डिग्री सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. गुरुवारी राज्याच्या तुलनेत अकोला व अमरावतीत सर्वाधिक तापमान होते. शुक्रवारनंतर उष्णतेची लाट ओसरणार आहे. 

- अनिल बंड, हवामानतज्ज्ञ असे आहे गुरुवारचे तापमान

अकोला ४४.०अमरावती ४३.८बुलडाणा ४१.२ब्रम्हपुरी ४१.७गडचिरोली ४०.२गोंदीया ४०.०नागपूर ४१.२वर्धा ४३.०यवतमाळ ४२.०

विदर्भात पाऊस

शुक्रवार, शनिवारी विदर्भात तुरळक ठिकाणी हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे. पूर्व विदर्भात अधिक शक्यता आहे. कमाल तापमानात घट होईल. पुढील पाच सहा दिवस कमाल तापमान ४२ ते ४३.५ अंशाच्या आसपास राहील. १० एप्रिलपर्यंत पुन्हा विदर्भात पावसाची शक्यता आहे.

यंदाचा उन्हाळा असणार अधिक कडक : सरासरी ०़ ५ अंशाने तापमान वाढण्याची शक्यता

यंदा एप्रिल ते जून या हंगामात मध्य भारत आणि उत्तरपश्चिम भारतात सरासरीपेक्षा ०़५ अंशाने वाढण्याची शक्यता असल्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. पश्चिम राजस्थानमध्ये हंगामातील सरासरीपेक्षा १ अंशाने तापमान जास्त असल्याची शक्यता आहे़. तसेच उष्ण झोनमध्ये तापमान अधिक राहण्याची शक्यता आहे. मराठवाडा, विदर्भ, मध्य महाराष्ट्र आणि आंध्र प्रदेशची किनारपट्टी या हवामानविभागाच्या उपविभागात उष्णतेची लाट येण्याची ४४ टक्के शक्यता असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. कोकण वगळता संपूर्ण महाराष्ट्र तसेच देशातील बहुतांश भागात उमेदवारांना प्रचार करताना कडक उन्हाचा सामना करावा लागला आहे.

 

टॅग्स :TemperatureतापमानAmravatiअमरावतीMaharashtraमहाराष्ट्रAkolaअकोला