यंदाचा उन्हाळा असणार अधिक कडक : सरासरी ०़ ५ अंशाने तापमान वाढण्याची शक्यता

By ऑनलाइन लोकमत | Published: April 2, 2019 01:11 PM2019-04-02T13:11:23+5:302019-04-02T13:14:53+5:30

भारतीय हवामान विभागामार्फत २०१६ पासून हंगामातील हवामानाचा दर तीन महिन्यांचा अंदाज देण्यास सुरुवात केली आहे़.

This summer will be more high : the average temperature of 0 to 5 degrees is expected to rise | यंदाचा उन्हाळा असणार अधिक कडक : सरासरी ०़ ५ अंशाने तापमान वाढण्याची शक्यता

यंदाचा उन्हाळा असणार अधिक कडक : सरासरी ०़ ५ अंशाने तापमान वाढण्याची शक्यता

Next
ठळक मुद्देएप्रिल ते जूनमधील हंगामातील तापमानाचा अंदाज सोमवारी जाहीर मेघालय, अरुणाचल प्रदेश, नागालँड, त्रिपुरा या भागात किमान तापमान सर्वसामान्य राहण्याची शक्यता

पुणे : यंदा एप्रिल ते जून या हंगामात मध्य भारत आणि उत्तरपश्चिम भारतात सरासरीपेक्षा ०़५ अंशाने वाढण्याची शक्यता असल्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे़. पश्चिम राजस्थानमध्ये हंगामातील सरासरीपेक्षा १ अंशाने तापमान जास्त असल्याची शक्यता आहे़. तसेच उष्ण झोनमध्ये तापमान अधिक राहण्याची शक्यता आहे़. मराठवाडा, विदर्भ, मध्य महाराष्ट्र आणि आंध्र प्रदेशची किनारपट्टी या हवामान विभागाच्या उपविभागात उष्णतेची लाट येण्याची ४४ टक्के शक्यता असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे़. कोकण वगळता संपूर्ण महाराष्ट्र तसेच देशातील बहुतांश भागात उमेदवारांना प्रचार करताना कडक उन्हाचा सामना करावा लागला आहे़. 
भारतीय हवामान विभागामार्फत २०१६ पासून हंगामातील हवामानाचा दर तीन महिन्यांचा अंदाज देण्यास सुरुवात केली आहे़. त्यानुसार एप्रिल ते जूनमधील हंगामातील तापमानाचा अंदाज सोमवारी हवामान विभागाने जाहीर केला आहे़. त्यानुसार उत्तर, उत्तर पूर्व आणि दक्षिण भारतातील हवामानाच्या उपविभागाव्यतिरिक्त अन्य हवामान विभागात दिवसाचे व रात्रीचे तापमान सरासरीच्या तुलनेत ५ ते १ अंशाने अधिक राहणार आहे़. हरियाना, चंदीगड, दिल्ली, पश्चिम व पूर्व उत्तर प्रदेश, पश्चिम व पूर्व राजस्थान, पश्चिम व पूर्व मध्य प्रदेश, छत्तीसगड, कर्नाटक किनारपट्टी, उत्तर कर्नाटकचा अंतर्गत भाग, रायलसीमा, तेलंगणा या विभागात तापमान अधिक राहण्याची शक्यता आहे़. तर अन्य विभागात तापमान सर्वसामान्य राहील़. 
जम्मू काश्मीर, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, पश्चिम बंगाल, सिक्कीम, आसाम, मेघालय, अरुणाचल प्रदेश, नागालँड, मेझोराम, त्रिपुरा या भागात किमान तापमान सर्वसामान्य राहण्याची शक्यता आहे़. पश्चिम, पूर्व राजस्थानमध्ये सरासरीच्या तुलनेत रात्रीचे तापमान १ अंशाने अधिक राहील़. 
नेहमी उष्णतेची लाट येत असते. राजस्थान, तेलंगणा, ओरिसा, उत्तराखंड, दिल्ली, हरियाना, उत्तर प्रदेश, गुजरात, मध्य प्रदेश, छत्तीसगड, बिहार, झारखंड या कोअर झोनमधील तापमान अधिक राहण्याची ४४ टक्के शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे़.
़़़़़
मराठवाडा, मध्य महाराष्ट्र, विदर्भात एप्रिल, मे व जून महिन्यात कडक उन्हाळा असणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे़.  लोकसभा निवडणुकांसाठी एप्रिल आणि मे महिन्यात मतदान होत आहे़ या निवडणुकांसाठी उमेदवारांना प्रतिस्पर्धेऐवजी अगोदर कडक उन्हाशी सामना करावा लागणार आहे़ .

Web Title: This summer will be more high : the average temperature of 0 to 5 degrees is expected to rise

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.