अमरावतीमध्ये पुन्हा दोन पॉझिटिह, चार मृतांसह कोरोनाग्रस्तांची संख्या दहा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2020 10:09 IST2020-04-24T10:09:27+5:302020-04-24T10:09:45+5:30

येथील क्लस्टर झोनमध्ये ९५ वर्षांच्या मृत महिलेसह एका २० वर्षांच्या तरुणाचा नमुना चाचणी अहवाल बुधवारी रात्री उशिरा पॉझिटिव्ह प्राप्त झाला. त्यामुळे शहरातील कोरोनाग्रस्तांची एकूण संख्या चार मृतांसह दहावर पोहोचली आहे.

In Amravati, again, two positives, four dead and ten corona victims | अमरावतीमध्ये पुन्हा दोन पॉझिटिह, चार मृतांसह कोरोनाग्रस्तांची संख्या दहा

अमरावतीमध्ये पुन्हा दोन पॉझिटिह, चार मृतांसह कोरोनाग्रस्तांची संख्या दहा

लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : येथील क्लस्टर झोनमध्ये ९५ वर्षांच्या मृत महिलेसह एका २० वर्षांच्या तरुणाचा नमुना चाचणी अहवाल बुधवारी रात्री उशिरा पॉझिटिव्ह प्राप्त झाला. त्यामुळे शहरातील कोरोनाग्रस्तांची एकूण संख्या चार मृतांसह दहावर पोहोचली आहे. पाटीपुरा भागातील या वृद्ध महिलेचा २१ एप्रिल रोजी राहत्या घरी नैसर्गिक मृत्यू झाल्याचे आरोग्य विभागाने सांगितले. त्यांचा थ्रोट स्वॅब तपासणीला अकोला येथील विषाणू संक्रमण चाचणी प्रयोगशाळेत पाठविला होता. या वृद्ध महिलेच्या परिवारातील पाच होम क्वारंटाईन व्यक्तींना येथील कोविड रूग्णालयात आयसोलेशन कक्षात ठेवण्यात आलेले आहे. तर २० वर्षीय युवक हा हैदरपुरा येथील मृत पॉझिटिव्ह वृध्देचा नातू असून यापूर्वीच आयसोलेशनमध्ये ठेवण्यात आल्याचे महापालिकेचे वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ विशाल काळे यांनी सांगितले

Web Title: In Amravati, again, two positives, four dead and ten corona victims