शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

‘ट्रायबल’मध्ये २६८ कोटींच्या फर्निचर खरेदीला तूर्तास ब्रेक

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2019 18:17 IST

आदिवासी विकास विभागाच्या शासकीय आश्रमशाळा, वसतिगृह आणि एकलव्य निवासी शाळांमध्ये विविध फर्निचर पुरवठा करावयाच्या २६८ कोटींच्या खरेदीला तूर्तास ब्रेक लागला आहे.

ठळक मुद्दे आदिवासी विकास विभागाच्या शासकीय आश्रमशाळा, वसतिगृह आणि एकलव्य निवासी शाळांमध्ये विविध फर्निचर पुरवठा करावयाच्या २६८ कोटींच्या खरेदीला तूर्तास ब्रेक लागला आहे.पुरवठादारांकडून अटीॆची पूर्तता होत नसल्याने पुनर्निविदा काढण्याचा निर्णय प्रधान सचिव मनीषा वर्मा यांनी घेतला आहे.फर्निचर हे केंद्र सरकारच्या ‘जेम’ पोर्टलवरून खरेदी करावयाचे आहे. त्यामुळे अटी, शर्तीबाबत काही सुधारणा, बदल केला जाणार आहे.

गणेश वासनिक अमरावती - आदिवासी विकास विभागाच्या शासकीय आश्रमशाळा, वसतिगृह आणि एकलव्य निवासी शाळांमध्ये विविध फर्निचर पुरवठा करावयाच्या २६८ कोटींच्या खरेदीला तूर्तास ब्रेक लागला आहे. पुरवठादारांकडून अटीॆची पूर्तता होत नसल्याने पुनर्निविदा काढण्याचा निर्णय प्रधान सचिव मनीषा वर्मा यांनी घेतला आहे.

नागपूर, नाशिक, ठाणे व अमरावती अपर आयुक्त या चारही कार्यालयांतर्गत २९ एकात्मिक प्रकल्प अधिकारी कार्यालय अधिनस्थ आश्रमशाळा, वसतिगृह, एकलव्य निवासी शाळांमध्ये फर्निचर पुरवठा करण्यासाठी ई-निविदा मागविल्या होत्या. नागपूर येथे ३० जानेवारी रोजी आदिवासी विकास विभागाच्या प्रधान सचिव मनीषा वर्मा यांच्या मार्गदर्शनात या निविदा उघडल्या. यावेळी विभागाचे उपायुक्त ढोके, उपसचिव सु.ना. शिंदे, नागपूरचे एटीसी ऋषिकेश मोडक, नाशिकचे गिरीश सरोदे, अमरावतीचे एम.जे. प्रदीपचंद्रन, तर ठाणे येथील एटीसी संजय मीना उपस्थित होते. मात्र, यावेळी सुमारे ३२५ पुरवठादारांपैकी एकानेही फर्निचर, साहित्य पुरवठा करण्याच्या अटी व शर्ती पूर्ण केल्या नाहीत. परिणामी पुनर्निविदा काढण्याबाबत निर्णय झाला. फर्निचर हे केंद्र सरकारच्या ‘जेम’ पोर्टलवरून खरेदी करावयाचे आहे. त्यामुळे अटी, शर्तीबाबत काही सुधारणा, बदल केला जाणार आहे. त्याअनुषंगाने काही अधिकारी दिल्ली येथील ‘जेम’ पोर्टल कार्यालयात गेल्याची माहिती आहे. फर्निचरचा पुरवठा दर्जेदार आणि टिकाऊ असावा, याला प्रधान सचिवांनी प्राधान्य दिले आहे. त्यामुळे पुरवठादार अटी, शर्ती पूर्ण करू शकले नाही. मात्र, लवकरच पुनर्निविदा प्रक्रिया राबविली जाणार असून, नामांकित कंपन्यांमार्फत ‘ट्रायबल’मध्ये फर्निचरचा पुरवठा केला जाईल, असे संकेत आहे.

हे साहित्य होणार खरेदी

आश्रमशाळा, वसतिगृह आणि एकलव्य निवासी शाळेकरिता टिकाऊ आणि दर्जेदार फर्निचर खरेदीचा प्रस्ताव आहे. यात डेक्स, बेंच, पलंग, बंग बेड, बेड, आलमारी, संगणक टेबल आदींचा समावेश असेल. राज्यात ५२५ शासकीय आश्रमशाळांमध्ये पुरवठा केला जाणार आहे.

तांत्रिक बीडमध्ये कोणतेही पुरवठादार अटी, शर्ती पूर्ण करू शकले नाही. त्यामुळे नव्याने ई-निविदा प्रक्रिया राबविली जाणार आहे. त्याअनुषंगाने प्रधान सचिव मनीषा वर्मा यांनी मार्गदर्शक सूचना दिल्या आहेत.- एम.जे. प्रदीपचंद्रन, अपर आयुक्त, अमरावती

टॅग्स :AmravatiअमरावतीSchoolशाळाStudentविद्यार्थीEducationशिक्षण