अमरावतीत राज्य राखीव दलाच्या पोलिसाने स्वत:च खांद्याला मारली गोळी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 29, 2018 15:54 IST2018-03-29T15:53:44+5:302018-03-29T15:54:11+5:30
येथील राज्य राखीव दलाच्या कॅम्प येथील एका पोलिसाने स्वत:च्याच उजव्या खांद्याला बंदुकीची गोळी मारून जखमी केले. ही घटना येथील एसआरपी कॅम्प प्रवेशद्वारावर गुरु वारी १ वाजतादरम्यान घडली.

अमरावतीत राज्य राखीव दलाच्या पोलिसाने स्वत:च खांद्याला मारली गोळी
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : येथील राज्य राखीव दलाच्या कॅम्प येथील एका पोलिसाने स्वत:च्याच उजव्या खांद्याला बंदुकीची गोळी मारून जखमी केले. ही घटना येथील एसआरपी कॅम्प प्रवेशद्वारावर गुरु वारी १ वाजतादरम्यान घडली. त्याची प्रकृती अत्यवस्थ असल्याने प्राथमिक उचारानंतर नागपूरला हलविले आहे.
मंगेश बाबुलाल वरठे (३५) असे सदर पोलिसाचे नाव आहे. ते येथील एसआरपी कॅम्पच्या मुख्य प्रवेशद्वारावर कर्तव्य बजावत होते. अचानक त्यांनी जवळील एसएलआर बंदूक उजव्या खांद्यावर लावून गोळी झाडल्याने तो गंभीर जखमी झाला. या घटनेची माहिती मिळताच इतर पोलिसांच्या मदतीने त्याला उपचारासाठी येथील जिल्हा सामान्य रूग्णालयात दाखल करण्यात आले. घरगुती किरकोळ कारणावरून सदर घटना घडल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविला जात आहे. जिल्हा शल्यचिकित्सक श्यामसुंदर निकम यांच्या मार्गदर्शनाखाली वैद्यकीय अधिकारी उज्ज्वला मोहड व इतर डॉक्टरांनी मंगेश यांच्यावर उपचार केला. घटनेची माहिती वाऱ्यासारखी सर्वत्र पसरल्याने पोलिसांचा ताफा व नागरिकांनी गर्दी केली होती. त्याची प्रकृती गंभीर असल्याने पुढील उपचाराकरिता नागपूर येथे हलविण्यात आले आहे. फ्रेजपुरा पोलीस अधिक तपास करीत आहेत. मंगेश हा सन २०११ च्या बॅचमध्ये पोलिसात भरती झाल्याची माहिती आहे. तो विवाहित असून त्याला आठ महिन्यांची मुलगी आहे.